फडणवीसांचे पीए असल्याचे भासवून लोकांकडून 15 लाख रुपये उकळणारे दोघे मुंबई पोलिसांच्या जाळ्यात!!

वृत्तसंस्था

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून 15 लाख रुपये उकळणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. Mumbai Police arrest two people for impersonating as PAs of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis and duping people to the tune of Rs 15 Lakhs.

आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए आहोत. तुम्हाला त्यांच्याकडून काही काम करून हवे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगून सुहास महाडिक आणि किरण पाटील हे दोघेजण लोकांना फसवत होते. काही लोकांकडून त्यांनी 15 लाख रुपये उकळले होते. पोलिसांना या संदर्भातली माहिती समजतात त्यांनी जाळे लावून या दोघांनाही अटक केली.

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध केस दाखल करून त्यांची चौकशी आणि तपास सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लोकांची फसवणूक करून आपण 15 लाख रुपये उकळण्याची कबुली सुहास महाडिक आणि किरण पाटील या दोन्ही आरोपींनी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Mumbai Police arrest two people for impersonating as PAs of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis and duping people to the tune of Rs 15 Lakhs.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात