आरोपी तीन वर्षांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सासूसोबत पत्नीच्या विषयावरुन झाला वाद आणि त्यातूनच त्याने केली सासूची हत्या. जावयाला पुण्यातून अटक
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमधील साकीनाका येथे घडलेल्या अमानवीय बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आणखी एक क्रुर घटना समोर आली आहे .जावयाने सासुच्या गुप्तांगात बांबू घुसवत तीची हत्या केली आहे. MUMBAI CRIME DIARIES: Another shocking incident in Mumbai; Bamboo-son-in-law Iqbal Sheikh arrested
मुंबईमधीलच विलेपार्ले येथे घडलेली आणखीन एक धक्कादायक घटना म्हणजे आठवडाभरापूर्वी मुंबई पोलिसांनी पुण्यामधून एका ४२ वर्षीय पुरुषाला अटक केली आहे. ४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीने २ सप्टेंबर रोजी आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केली. १ सप्टेंबर रोजी हा आरोपी जामीनावर बाहेर आला होता. आरोपी तुरुंगामध्ये असताना त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं होतं. मात्र याबद्दल त्याची सासू त्याला काहीच माहिती देत नसल्याने या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामधूनच त्याने सासूची हत्या केल्याची माहिती समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे साकीनाका प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही आरोपीने महिलेच्या गुप्तांगामध्ये बांबू घुसवून तिची हत्या केलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास विलेपार्ले पूर्वेतील हनुमान रोड येथील पितळेवाडीमध्ये हे हत्याकांड घडलं. मरण पावलेल्या महिलेचं नाव शामल सिंगम असं असून ती तिची मुलगी लीनासोबत राहत होती. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी इक्बाल शेखला अटक केली असून तो विलेपार्लेमधील बामनवाडा येथील रहिवाशी आहे. इक्बाल आणि लीनाचं २०११ साली लग्न झालं होतं. या दोघांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन मुलं आहेत.
इक्बालला १ सप्टेंबर रोजी पुण्यातील येरवाडा तुरुंगामधून सोडण्यात आलं होतं. दहिसरमध्ये साखळीचोरीप्रकरणी इक्बालला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली. शिक्षा पूर्ण करुन इक्बाल बाहेर आल्यानंतर तो लीनाला भेटण्यासाठी गेला. मात्र लीनाच्या घरी गेल्यावर त्याला तिथे शामल यांनी लीनाने दुसरं लग्न केलं असून तिला ११ महिन्यांचा एक मुलगा आणि तसेच ती आता पुन्हा गरोदर आहे अशी माहिती इक्बालला दिली. “त्याने लीनाला दुसऱ्या पतीला सोडून पुन्हा आपल्याकडे येण्यासंदर्भात धमकी दिली. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा लीना आणि त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी गेला असता लीना आईच्या घरी नव्हती हे त्याच्या लक्षात आलं,” अशी माहिती विलेपार्ले पोलिसांनी दिलीय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App