मुंबईतून काँग्रेस गायब; अंतर्गत गटबाजीने पोखरलेला पक्ष विश्रांती मोडवर

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार याबाबत अनिश्चितता असल्याने काँग्रेस पक्ष सध्या पुर्ण विश्रांती घेत असून मुंबईतून काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि एकूणच पक्ष गायब असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे भाजपा मात्र जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. Mumbai Congress is on rest mode as infighting goes

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी घडत असतना काँग्रेस मात्र अंतर्गत वादात पोखरून निघाला आहे. मुंबईत काँग्रेसची पारंपरिक मते असून मुंबई महापालिकेत गेल्यावेळी ३५ नगरसेवक निवडून आले होते. भाजपाने ८३ नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही पहारेकरी म्हणून भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले मात्र त्यानंतर महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आले. राज्यात काँग्रेस , शिवसेना एकत्र तर महापालिकेत विरोधात. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था काँग्रेसची झाली. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेने मिलिभगत करुन मुंबईकरांची थट्टा केली त्याचा फटका काँग्रेसला या निवडणुकीत बसेल असा कयास आहे. विरोधाचे नाटक करुन मुंबईकरांच्या प्रश्नांवर बोटचेपी भूमिका घेणारी काँग्रेस एका बाजूला तर दुसरीकडे मुंबईकरांचे प्रश्न घेऊन आक्रमकपणे उतरलेला भाजप यातील फरक मुंबईकरांनी पाहिला.

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची मोठा गाजावाजा करीत नियुक्ती झाली पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपध्दतीचा फटका मुंबई काँग्रेसला बसला आणि सुरुवात आक्रमकपणे करणारे भाई जगताप हळूहळू मैदानातून गायब झाले. राज्यातील महाआघाडी सरकार गेल्यानंतर तर काँग्रेसमध्ये चिडीचूप वातावरण पहायला मिळते आहे.



भाजपाने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपाच्या मुंबई अध्यक्ष पदी पुन्हा आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती केली. पक्षात एकाच व्यक्तीला तिसरी टर्म दिली जात नसतानाही, आशिष शेलार यांना पुन्हा भाजपाने अध्यक्ष केले ते गेल्यावेळी पक्षाला त्यांच्या अध्यक्षतेखाली मिळालेल्या यशाचा विचार करुनच. त्यामुळे भाजपा पुन्हा आक्रमक झाली असून संघटनात्मक बांधणीही मजबूत करण्यात आली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र, शिवजयंती असे उत्सव जोरदार करुन जनमानसात भाजपा रोज सहभागी होते आहे. अशावेळी काँग्रेस मात्र गायब आहे. काँग्रेस राज्यात विरोधी पक्षात आहे, महापालिकेत प्रशासक आहे अशावेळी काँग्रेसला मुंबईकरांच्या प्रश्नांवर रान उठवण्याची संधी आहे पण अंतर्गत वादातच पक्षाच्या चिंधड्या उडाल्याचे चित्र आहे.

शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उरलेल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन उध्दव ठाकरे मतांची गोळाबेरीज करीत आहेत. कधी मुस्लिम, जैन, तर कधी उत्तर भारतीय मतदारांना भेटून साद घालत आहेत. पुर्वी हा मतदार पारंपरिक काँग्रेसकडे होता तर आता तो बहुसंख्येने भाजपा सोबत आहे. भाजपा सोबत न गेलेल्या किंवा दुखावलेल्यांची मनधरणी उध्दव ठाकरे करीत आहेत . वास्तविक हे काँग्रेसने करणे अपेक्षित होते पण काँग्रेस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेने सोबत युती न करता स्वबळावर लढण्याचे मनसुबे आखत असली तर मुंबईच्या मैदानातून आता काँग्रेस गायब आहे. ना कुठला कार्यक्रम, ना सभा, ना बैठका, ना पत्रकार परिषद, ना गावात कुठले होर्डिंग.. काँग्रेसबाबत असे चित्र पहायला मिळते आहे.

Mumbai Congress is on rest mode as infighting goes

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात