प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालक यांच्याकडून 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग केसच्या सुनावणीच्या वेळी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोर्टात हजर होत्या. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांच्याशी चर्चा केली. सरकारनामा या वेबपोर्टलने ही बातमी दिली आहे.MP Supriya Sule appears in court during Anil Deshmukh Deshmukh’s hearing
अडचणीत आलेल्या कोणत्याही राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यामागे सुप्रिया सुळे नेहमी उभ्या असलेल्या दिसतात, असे या बातमीत नमूद करण्यात आले आहे. अनिल देशमुख आणि सुप्रिया सुळे यांची एकमेकांमध्ये चर्चा झाली नाही फक्त कोर्ट रूम बाहेर एकमेकांना पाहिल्यानंतर त्यांनी नमस्कार केले. परंतु, प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांनी अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांच्याशी चर्चा करताना दिसल्या.
अनिल देशमुख यांनी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाने आज 15 नोव्हेंबरपर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत पाठवले आहे. तत्पूर्वी अनिल देशमुख यांनी न्यायाधीशांना पत्र लिहून आपल्याला ईडीने आत्तापर्यंत दोनशे प्रश्न विचारले आहेत.
आता माझ्याकडे उत्तर देण्यासारखे काही नाही. त्यामुळे ईडीच्या कोठडीत पाठविण्यात येऊ नये, अशी विनंती केली होती. परंतु कोर्टाने त्यांना 15 नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App