विशेष प्रतिनिधी
पुणे : व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेचा शिरूरचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना पश्चाताप झाला आहे. डॉ. कोल्हे यांनी आळंदी येथे यासाठी आत्मक्लेष करून घेतला.MP Amol Kolhe finally regrets playing the role of Nathuram Godse.
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही डॉ. कोल्हे यांनी केलेल्या भूमिकेवरून टीका केली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोधही केला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील मित्र पक्ष असणाºया काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.
या वेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, जो एक सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे, जो मी २०१७ मध्ये केला होता. व्हाय आय किल्ड गांधीमध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याही पेक्षा जास्त महत्वाचं मला हे वाटतं, की अनेकांनी मला व्यक्तिशा ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारले.
त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरंतर आम्हाला पसंत पडलेलं नाही. त्यांच्या विचारांना हा धक्का लागला, त्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत पोहचवली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. २०१७ मध्ये अजाणतेपणे जी गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.
जी भूमिका मी केली तो विचार, त्या विचारधारेचं समर्थन मी कधीही केलेले नाही. कधी करणार नाही हे मी या पूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जी भूमिका मी भविष्यात घेईन ती लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडणार आहे. ज्या युवा पिढीने माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाविषयी, राष्ट्रपित्यांबाबत, राष्ट्रपुरूषांबाबत एक संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये.
यासाठी मला वाटतं मी ही भूमिका घेणं आणि ती स्वच्छपणे समोर मांडणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. म्हणूनच आज महात्मा गांधीजींच्या पूर्वसंध्येस जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, त्या इंद्रयणीच्या काठी आळंदीला मी येऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं.
ज देशपातळीवर जे विखाराचं वातावरण तयार केलं जातंय त्या विखाराच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बापूजींना मी हीच प्रार्थना केली जी त्यांनी आपल्याला दिली ती म्हणजे या विखाराच्या वातावरणात सबको सन्मती दे भगवान.राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी नेहमीच नथुराम गोडसेला विरोध करत आली आहे.
त्यामुळे अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका करणं हे पक्षाच्या विचारसरणीविरोधात आहे. एकाप्रकारे हे नथुराम गोडसेचं उदात्तीकरण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच अभिनेता आणि सोबतच खासदार असलेल्या अमोल कोल्हेंच्या या चित्रपटाला विरोध होत आहे. अमोल कोल्हे यांनी मात्र हा चित्रपट केला तेव्हा सक्रीय राजकारणात नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App