विशेष प्रतिनिधी
नागपूर : रात्री उशिरापर्यंत जागून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणाऱ्या लहान मुलांना शाळांच्या लवकरच्या वेळांमुळे लवकर उठावे लागते. त्यांची झोप पूर्ण होत नाही त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे सकाळच्या शाळांच्या वेळा बदलाव्यात, अशी सूचना राज्यपाल रमेश बैंस यांनी केली होती. ही सूचना शिंदे – फडणवीस सरकारने अंमलात आणली असून यापुढे महाराष्ट्रात सकाळची शाळा 9.00 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, “घड्याळ्यात वाजले नऊ; सकाळच्या शाळेला जाऊ!!” असे नवे गाणे म्हणू शकणार आहेत. Morning school timing will be 9.00 am in maharashtra
शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी शाळा सकाळी 9.00 वाजता सुरू करण्याची घोषणा केली. आता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळांची वेळ आता सकाळी लवकर नसणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र शाळांच्या वेळांमुळे या झोपेमध्ये व्यत्यय येत होता. परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळी लवकर किंवा लवकर शाळेची वेळ असल्यामुळे पहाटे लहान मुलांना उठावे लागत. त्यामुळे लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने लहान मुलांच्या शाळेची वेळ बदलण्यात यावी. अशी सूचना राज्यपाल रमेश बैंस यांनी केली होती. त्यानंतर येथे शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळांची वेळ सकाळी 9.00 वाजण्याची ठेवण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळात केली.
महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. तर माध्यमिक शाळांच्या वर्ग दुपारी भारतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांचे पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय 3 ते 10 वर्षांच्या आत असतं. त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात. अशा सूचना शिक्षण तज्ञांकडून येत होत्या. या निर्णयामुळे आता लहान मुलांच्या पालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
तसेच लहान मुलांच्या झोपेबाबत मनोवैज्ञानिक त्याचबरोबर बालरोग तज्ञ देखील सांगतात की, बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांचे झोप पूर्ण होत नाही. परिणामी त्यांच्या आरोग्यावर विविध परिणाम होत. असल्याचा अहवाल देखील लवकरच येणार आहे. यासाठी सरकारने एक मनोवैज्ञानिक आणि बालरोग तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App