विम्याचे जास्त पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने उत्तरप्रदेश आणि दिल्ली येथील तिघांनी मिळून एका महिलेची तब्बल 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. More Insurance money bait 36 lakhs rupees of Kondhve Dhawde residents 34yrs women
विशेष प्रतिनिधी
पुणे : विम्याचे जास्त पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने उत्तरप्रदेश आणि दिल्ली येथील तिघांनी मिळून एका महिलेची तब्बल 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिस ठाण्यातून हा गुन्हा तपासासाठी उत्तमनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार अशोक शिवकुमार राम (रा. उत्तरप्रदेश), प्रवीणकुमार सिंग (रा. दिल्ली) आणि महेश सिंग (रा. दिल्ली) या तिघांवर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोंढवे-धावडे येथे राहणार्या एका 34 वर्षीय महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. हा प्रकार 16 जून 2021 ते सात जानेवारी 2022 रोजी घडला.
फिर्यादी यांच्या आईची एका खासगी विमा कंपनीची पॉलिसी आहे. आरोपींनी तक्रारदार महिलेला फोन करून ते विमा लोकपाल कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेच्या आईच्या विमा पॉलिसीचे जास्तीत जास्त पैसे मिळवून देतो, असे आरोपींनी सांगितले. त्यासाठी अगोदर तुम्हाला काही पैसे जमा करावे लागतील, असे सांगून आरोपींनी गुगल पे आणि ‘आरटीजीएस’द्वारे एकूण 36 लाख 33 हजार 553 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. मात्र, सहा ते सात महिन्यानंतरही पॉलिसीचे पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App