
वृत्तसंस्था
मुंबई – कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद झाल्यानंतर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन नियमावलीमध्ये काही नव्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे. more changes in break the corona chain rules in maharashtra
यामध्ये सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये RTPCR चाचणी सक्तीची करण्यासंदर्भातल्या नियमाप्रमाणेच इतर काही नियमांमध्ये केलेल्या बदलांचा समावेश आहे. या बदलांमुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
तसेच, आपलें सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी अशा एक खिडकी सेवा शनिवार-रविवार वगळता आठवड्याच्या इतर दिवशी सुरू ठेवण्याची परवानगी देखील नव्या बदलांनुसार देण्यात आली आहे.
RTPCT ऐवजी अँटिजेनला परवानगी!
सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक, चित्रपटांचं चित्रीकरण, मालिकांचं चित्रीकरण, जाहिरात, होम डिलीवरी करणारे कर्मचारी, परीक्षा घेणारे कर्मचारी, विवाहस्थळी असणारे कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी, खाद्यपदार्थांचे विक्रेते, उत्पादन क्षेत्रातले कर्मचारी, इ-कॉमर्स क्षेत्रातले कर्मचारी, परवानगी असलेल्या बांधकाम क्षेत्रातले कर्मचारी, बँकिंग क्षेत्रातले कर्मचारी यांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.
मात्र, ९ एप्रिल रोजी काढलेल्या शासकीय परिपत्रकानुसार या कर्मचाऱ्यांना RTPCR चाचणीऐवजी अँटिजेन चाचणी करण्याची मुभा देण्यता आली आहे. या नियमावली बदलातून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येण्याची अपेक्षा आहे.
more changes in break the corona chain rules in maharashtra
हे ही वाचा…
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला
- राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले
- काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार
- राज्यात ऑक्सिजन पुरवठ्याचे आव्हान ; अनेक कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू
- राहुल गांधींचे परकीय फार्मा कंपन्यांसाठी लॉबिंग, अनेक देशांचे दौरे केले, पण माहितीच दिली नाही; रविशंकर प्रसादांची खोचक टीका