Monsoon Session 2021 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुफान राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या ठरावानंतर चर्चेवेळी तालिका अध्यक्षांनी छगन भुजबळ यांच्यानंतर बोलू दिलं नाही, यानंतर संतापून माइक फेकून दिला. यानंतर भाजप आमदारांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. यावेळी तालिका अध्यक्षांचा माइक हिसकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय अध्यक्षांना शिवीगाळी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर भाजपच्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. Monsoon Session 2021 Live updates 12 BJP MLAs suspended, Devendra Fadnavis vs Chhagan Bhujbal
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुफान राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या ठरावानंतर चर्चेवेळी तालिका अध्यक्षांनी छगन भुजबळ यांच्यानंतर बोलू दिलं नाही, यानंतर संतापून माइक फेकून दिला. यानंतर भाजप आमदारांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. यावेळी तालिका अध्यक्षांचा माइक हिसकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय अध्यक्षांना शिवीगाळी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर भाजपच्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरिकल डाटा उपलब्ध होण्याचा ठराव मांडला आणि तो मंजूर केला. भुजबळांनी फडणवीसांच्या काळात झालेल्या पत्रव्यवहार सभागृहात वाचून दाखवला. त्यावर फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिले, परंतु सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या व्यासपीठाला घेराव घातला. इकडे बोलू न दिल्यामुळे फडणवीस यांनी माइकच फेकून दिला.
या गोंधळातच ओबीसी आरक्षणाबाबतच ठराव मंजूर करण्यात आला. पण भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव दालनाकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना हा गदारोळ उडाल्याचं सांगितलं जात आहे. राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्तिकुमार बगाडिया या आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झालं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
Monsoon Session 2021 Live updates 12 BJP MLAs suspended, Devendra Fadnavis vs Chhagan Bhujbal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App