वृत्तसंस्था
नाशिक : अंकाई किल्ल्यावर पैशाचं झाड असून श्रद्धेपोटी अंधश्रद्धेने झाडाचा ऱ्हास होत चालला आहे. आता झाडाला पालवी फुटल्यानेत्याच्या संवर्धनासाठी ट्रेकर्स आणि पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. Money tree on Ankai fort, degradation of Vada by faith; Environmentalists rushed for conservation
येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्याच्या माथ्यावर एक पुरातन वटवृक्ष आहे. या ठिकाणी येणारे भाविक श्रध्देपोटी या झाडावर मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून पैसे ठोकत असतात. मात्र अंधश्रध्देपोटी या वटवृक्षाचे मोठ नुकसान झाले आहे. ट्रेकर्स पर्यावरणप्रेमी यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे अंधश्रध्देपोटी एका पुरातन वृक्षाचा ऱ्हास होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रभु श्रीरामचंद्र यांना चौदा वर्षाचा वनवास झाल्यानंतर ते या ठिकाणी अगस्तीमुनीच्या दर्शनासाठी आले होते. त्यामुळे अंकाई किल्ला प्रसिध्द आहे.त्यामुळे श्रावणा व्यतिरिक्त या ठिकाणी अनेक भाविक दर्शनाला येत असतात आणि ते या पीर बाबाच्या दर्ग्याजवळील या वटवृक्षाला भेट देऊ मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून वटवृक्षाच्या खोडावर पैसे ठोकतात. ज्यामुळे या वटवृक्षाचे खोड जिर्ण झाले असले तरी त्याला पालवी फुटलेली आहे. मात्र, अंधश्रध्देपायी हा वटवृक्ष नामशेष होतो की काय अशी भिती व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App