प्रतिनिधी
संभाजीनगर : केंद्र आणि राज्य सरकारांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली नाही म्हणून नुसतेच गळे काढणारे एएमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटा उधळून पैशाचा पाऊस पाडला. आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. Money rained on MP Imtiaz Jalil by throwing notes
विशेष म्हणजे जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या.
खासदार जलील यांच्याकडून आमखास मैदानावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण येऊन भेट देऊन जात आहे. दरम्यान शुक्रवारी याच आमखास मैदानावर जलील यांच्याकडून कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादीच्या वाटेवर..? नवाब मलिकांना पर्याय शोधण्यासाठी चाचपणी
मात्र कव्वाली सुरू होताच जलील यांच्या समर्थकांकडून जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे जलील यांच्यावर अशा प्रकारे पैसे उधळताना बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
यापूर्वीही उधळले होते पैसे…
यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न शहरातील एका प्रसिद्ध लॉ मध्ये झाले होते. त्यावेळी देखील कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला आलेले खासदार इम्तियाज जलील हे नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता, तर खुलताबाद येथे आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैसे उधळले गेले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App