मनी लाँड्रिंग प्रकरण : ईडी ने अनिल देशमुख यांना विशेष PMLA न्यायालयात केले हजर


अनिल देशमुख यांची अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 12 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान ईडीला अनिल देशमुख यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. Money laundering case: ED summons Anil Deshmukh in special PMLA court


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज ईडीने विशेष PMLA (पीएमएलए) न्यायालयात हजर केले आहे. ईडीने काल अनिल देशमुखला अटक केली होती. अनिल देशमुख यांची अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 12 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान ईडीला अनिल देशमुख यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) अनिल सिंग विशेष पीएमएलए न्यायालयात पोहोचले आहेत.अनिल देशमुख यांच्या रिमांड अर्जात ते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने हजर होत आहेत.

अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले की, आम्ही साडेचार कोटी रुपयांच्या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य केले.देशमुखांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीला न्यायालयासमोर आम्ही विरोध करू.

Money laundering case: ED summons Anil Deshmukh in special PMLA court

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*