भाजपकडून मनसेला पुन्हा एकदा युतीसाठी इशारा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.फडणवीसांच्या उत्तरात दडलयं काय?
शिवसेनाला शह देण्यासाठी भाजप आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्याची दाट शक्यता आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेने भाजप सोबत युती तोडत विरूद्ध विचारसरणीच्या इतर पक्षांसोबत गाठ बांधली त्यानंतर महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले .राज ठाकरे यांच्या मनसेने काही दिवसांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलला तो विशेषत: भगवा करण्यात आला .खरे तर तेव्हापासूनच भाजप-मनसे युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला .आता परत एकदा मोदी-राज एकत्र येणार अशी कुजबूज ऐकायला मिळत आहे.याला कारणही तसेच असतात .मध्यंतरी मनसेने पत्रकार परिषद घेतली त्यात पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेचा ‘राज’सेनेने चांगलाच समाचार घेतला होता. Modi-Raj together! Will there be a BJP-MNS alliance? Answer by Fadnavis
आता परत आगामी काळात भाजप आणि मनसे एकत्र येणार का? अशी चर्चा वारंवार रंगण्याची दाट शक्यता आहे . कारण भविष्यात भाजप-मनसेची युती होऊ शकते असे संकेत स्वत: विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आहेत.
लोकसत्ता या वृत्तपत्राच्या एका विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आज (4 जून) बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी देवेंद्र फडणवीस यांना असा प्रश्न विचारला की, आता आपल्या सोबत शिवसेना नाही अशावेळी आपण कोणाला सोबत घेणार का?
याच प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आपण मनसेबाबत बोलता आहात ना ! हे मला माहिती आहे. खरं म्हणजे मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलं आहे. त्यांची काही बाबतीत आमच्याशी मतं जुळली तर आम्ही नक्कीच वेगळा विचार करु.’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलं आहे किंवा ते स्वीकारत आहेत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण त्याचवेळी आमचा अजेंडा हा व्यापक आहे. हे बघा क्षेत्रीय अस्मिता जी असते ती आमच्याकडे देखील आहे. महाराष्ट्राच्या हिताचाच आम्ही विचार करु. पण क्षेत्रीय अस्मिेसोबतच राष्ट्रीय अस्मिता देखील आम्हाला महत्त्वाची आहे.
मराठी माणसावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. पण मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही याकरता दुसऱ्यावर अन्याय करुन आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देत नाही ही भूमिका आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे क्षेत्रीय अस्मिता एक नंबरवर असली तरी राष्ट्रीय अस्मिता विसरता येणार नाही या मताचे आम्ही आहोत.
आता तरी आमची आणि मनसेची मत वेगवेगळी आहेत. ती मतं जुळली तर वेगळा विचार करता येईल. आज तरी ती मतं जुळत नाहीत. त्यामुळे सध्या तरी युतीचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
असे झाले तर महाराष्ट्रात एक नवी युती यावेळी पाहायला मिळू शकते हे मात्र नक्की !
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App