छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा मोदी सरकारचा युनेस्कोला प्रस्ताव!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांचा परिसर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने युनेस्कोला सादर केला  आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड, जन्मभूमी शिवनेरी, सागरी किल्ले सिंधुदुर्ग विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यांच्यासह तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड आदी किल्ल्यांचा समावेश आहे. Modi government’s proposal to UNESCO to include the forts in the world heritage list

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने हा प्रस्ताव तयार करून तो युनेस्कोला सादर केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबद्दल मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट अशी :

महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ! आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

यात किल्ले रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 12 किल्ल्यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अनेकानेक आभार ! ॥ जय जिजाऊ , जय शिवराय

Modi government’s proposal to UNESCO to include the forts in the world heritage list

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात