मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स राज’ला आळा, वेदनेचा प्रवास आता अभिमानात, सायरस पुनावाला यांच्याकडून कौतुक

विशेष प्रतिनिधी

 पुणे : मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स राज’ला आळा बसला आहे. पूर्वी प्रशासकीय परवानग्या मिळवताना खूप आव्हानांचा सामना करावा लागला. वेदनेचा प्रवास आता अभिमानामध्ये बदलला आहे, अशा शब्दात ज्येष्ठ उद्योगपती आणि सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस  पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.Modi goverment end era of ‘License Raj’ , journey of pain is now in pride, appreciation from Cyrus Punawala

कोरोना महामारीत आशेचा किरण ठरलेली करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून भारतासह अनेक देशांना दिलासा देणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांना मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.



यावेळी बोलताना पुनावाला म्हणाले, आम्ही जगाच्या तुलनेत खूप कमी किमतीत लस विकतो आहे. आमच्या कुटुंबाने मोठा त्याग केला आहे.  लोकमान्य टिळक हे द्रष्टे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मानाचा पुरस्कार घेताना खूप आनंद होत आहे.

1889 मध्ये लोकमान्य टिळक यांनी लस उत्पादनाचे मोठे केंद्र पुण्यात व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे स्वप्न सिरमच्या रुपात साकार झाले याचा अभिमान वाटतो. मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करतो.

Modi goverment end era of ‘License Raj’ , journey of pain is now in pride, appreciation from Cyrus Punawala

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात