Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 7 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 17 ते 22 मंत्री शपथ घेतील. असे मानले जाते की, ज्या राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमधील सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन मंत्रिमंडळात प्राधान्य दिले जाईल. याशिवाय मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा समावेश करून एनडीएला बळकटी देण्याची तयारी सुरू आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश असू शकतो, हे जाणून घ्या… Modi Cabinet expansion likely on 7th july 2021, sindhiya sonowal sushil modi and 22 others in race
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 7 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 17 ते 22 मंत्री शपथ घेतील. असे मानले जाते की, ज्या राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमधील सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन मंत्रिमंडळात प्राधान्य दिले जाईल. याशिवाय मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा समावेश करून एनडीएला बळकटी देण्याची तयारी सुरू आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश असू शकतो, हे जाणून घ्या…
उत्तर प्रदेश तीन ते चार मंत्र्यांचा समावेश असेल अपना दलमधून अनुपिया पटेल
बिहार दोन ते तीन मंत्री भाजप – सुशील मोदी जेडीयूमधील आरसीपी सिंग एलजेपीमधील पशुपती पारस
मध्य प्रदेश एक ते दोन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया राकेश सिंह
महाराष्ट्र एक ते दोन मंत्री नारायण राणे हिना गावित रणजित नाईक निंबाळकर
राजस्थान एक मंत्री असण्याची शक्यता
जम्मू-काश्मीर एक मंत्री असू शकतो
लडाख एक मंत्री असू शकतो
आसाम एक ते दोन मंत्री सोनोवाल
पश्चिम बंगाल शंतनू ठाकूर निशिथ प्रामाणिक
ओडिशा एक मंत्री असू शकतो
दरम्यान यावेळी रालोआतील पक्षदेखील मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात. जेडीयू, एलजेपी आणि वायएसआर कॉंग्रेसपैकी अनेकांचा मंत्रिमंडळात समावेश असू शकतो.
हे मंत्री आपला अतिरिक्त प्रभार सोडू शकतात
सध्याच्या मंत्रिमंडळात अतिरिक्त प्रभार असलेले नऊ मंत्री आहेत. प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, डॉ. हर्षवर्धन, नरेंद्रसिंह तोमर, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, हरदीपसिंग पुरी हे आपले अतिरिक्त मंत्रालय सोडून नव्या मंत्र्यांसाठी जागा करू शकतात. केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असू शकतात. सध्या येथे 53 मंत्री आहेत, म्हणजेच 28 मंत्र्यांची भर घातली जाऊ शकते.
Modi Cabinet expansion likely on 7th july 2021, sindhiya sonowal sushil modi and 22 others in race
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App