एनडीए ४०० पार आणि महाराष्ट्र ४५ पार हा नारा खरा करून दाखवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू , असंही शिंदे म्हणाले
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्रार्पण आणि लाभ वितरण सोहळा बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.Modi and Janata are the strong combination of Favicall Eknath Shinde
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, जलसंधारण तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावनाताई गवळी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार हंसराज अहिर, आमदार मदन येरावार, अशोक उईके, संजीव रेड्डी बोदकुरवार, निलय नाईक, नामदेवराव ससाणे उपस्थित होते.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे वितरण करून देशातील शेतकऱ्यांना खात्यात २१ हजार कोटींचे लाभ दिले, नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करून राज्यातील शेतकऱ्यांना अजून ३ हजार ८०० कोटींचे लाभ दिले.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातील स्वयं सहाय्यता गटांना ८०० कोटींच्या निधीचे वाटप, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १ करोड नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण, मोदी आवास योजनेचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला. या अंतर्गत मागासवर्गीय नागरिकांसाठी १० लाख घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच विदर्भातील न्यू आष्टी – अमळनेर नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन व प्रवासी सेवेचा शुभारंभ, वर्धा- कळंब नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन आणि प्रवासी सेवेचा शुभारंभ, वरोरा- वणी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे लोकार्पण, साकोली-भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, सलाईखुर्द-तिरोडा महामार्गावरील कॉक्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण तसेच यवतमाळ शहरातील पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात, पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यासोबतच त्यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या दशकभरात सुवर्णकाळ सुरू झाला असून अनेक क्षेत्रात देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. राज्यातील महिला सशक्तीकरण अभियानाद्वारे ५५ हजार महिलांना लाभ होणार असून ही संख्या २ कोटीपर्यंत वाढवण्यात येईल. असे म्हटले
याशिवाय मोदी आणि जनता हा फेवीकॉलचा मजबूत जोड असून केंद्र सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा विजयी होतील, तसेच त्यांनी दिलेला एनडीए ४०० पार आणि महाराष्ट्र ४५ पार हा नारा खरा करून दाखवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू आणि मोदीजींचे हात बळकट करू असे यावेळी जाहीर केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App