कोल्हापुरात मोका अंतर्गत भास्कर डॉन गॅंगवर कारवाई

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : जवाहर नगर येथील भास्कर डॉन गॅंगमधील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पाच जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी दिली. संकेत व्हटकर, शंकर शामराव भास्कर, अमोल महादेव भास्कर, महादेव शामराव भास्‍कर व पिंटू महादेव भास्कर अशी या पाच जणांची नावे आहेत. पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ही माहिती दिली.

Mocca on Bhaskar Don gang in Kolhapur

एका ज्येष्ठ नागरिकाने जवाहर नगर येथे सेवानिवृत्ती नंतर प्लॉट घेतला होता. भास्कर गॅंगमधील या संशयित पाच जणांवर तो प्लॉट हडप करण्याच्या उद्देशाने सदर नागरिकास दमदाटी व धमकी दिल्याचे प्रकरणावरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झालेल्या तपासात या गॅंगविरुद्ध संघटित गुन्हेगारी केल्याचे दखलपात्र व गंभीर स्वरूपाचे ४८ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. जबरी चोरी, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे व खंडणी अशा गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.


जातीय हत्याकांडाच्या घटनांची सरसकट सीआयडी चौकशीची दलित संघटनांची मागणी


कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी मोका अंतर्गत संबंधित गॅंग विरोधात प्रस्ताव तयार केला. मंजुरीसाठी सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना सादर करण्यात आला. या प्रस्तावास मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले की, सदर गुन्ह्याचा तपास जयसिंगपूर पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वेंजणे यांच्याकडे दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मोका अंतर्गत सात टोळ्यांमधील बावन्न संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. या महिन्यातील ही चौथी कारवाई आहे. पोलीसांनी सांगितले की नऊ जणांवर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई झाली आहे.

Mocca on Bhaskar Don gang in Kolhapur

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात