
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून त्यांनी जोरदार कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही निवडणुकीची जोरदार तयारी झाल्यास सुरू केली असून शिवसेनेवर तिखट वार करायला देखील प्रारंभ केला आहे. नुकताच मनसेचा पुण्यात वर्धापन सोहळा झाला. या पार्श्वभूमीवर मनसेने पुण्यात शक्तिप्रदर्शन केले. यंदाच्या निवडणुकीमध्ये आता दंड थोपटला असून शिवसेनेला डिवचण्याचे काम सुरु केल्याचे दिसतेय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आता एक ट्विट करत शिवसेनेला जुनी आठवण करुन देत आव्हानच दिले आहे. MNS removes scab on Raut’s wound; Shiv Sena’s vehicle will be overturned again … !!
जुनी आठवण करुन मनसेनं काढली खपली!
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जुन्या गोष्टीची आठवण करुन दिली आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज समर्थकांनी संजय राऊत यांची गाडी फोडून पलटी केली होती. त्या घटनेचा जुना फोटो ट्विट करत संदीप देशपांडे यांनी राऊतांवर शरसंधान केले आहे.
काय आहे देशपांडेंचे ट्विट
या ट्विटमध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची गाडी पलटी केली होती, या निवडणुकीतही आम्हीच तुमची गाडी पलटी करणार, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची गाडी पलटी केली होती,या निवडणुकीतही आम्हीच तुमची गाडी पलटी करणार pic.twitter.com/xaweDwwxU5
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 14, 2022
संदीप देशपांडे आणखी एक सूचक ट्विट
मनसेच्या वर्धापन दिनी पुणे येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल केली. त्यावर आमचे राज्य हे मिमिक्रीवर चालत नाही, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्वीटवरुन सुद्धा चर्चा रंगली आहे.
जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरचं जेवण मागतात, काहींना पुस्तकं लागतात, काहींना औषध लागतात, यापुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असे सूचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
MNS removes scab on Raut’s wound; Shiv Sena’s vehicle will be overturned again … !!
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी कोणत्या घरातून येतो हे ठाकरे-पवारांना माहिती नाही’ – फडणवीसांचा प्रहार
- सफाई कामगार झाला आमदार; संत कबीर नगरच्या गणेश चंद्र चौहान यांची कथा
- बांकेबिहारी मंदिरात रंगांची होळी आज सुरू होणार
- बारावी रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती, प्राध्यापकाला अटक, तीन विद्यार्थी सामील
- वॉलेटवर वर्ग केलेल्या कोट्यवधींच्या बिटकॉईनसाठी आरोपींकडे पासवर्डबाबत कसून चौकशी; पाटील, घोडे यांच्या कार्यालयाची झाडाझडती