विशेष प्रतिनिधी
मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यासाठी पालिका प्रशासनाने महापालिकेच्या मुख्यालयातील भिंती, शहरातील उद्यानाच्या आणि सार्वजनिक परिसराच्या सरक्षण भिंतीवर पोस्टर्स, बनर लावत जनजागृती सुरु केली आहे.MNS is aggressive again for Marathi
कुठे पाणी जपून वापरा, कुठे स्वच्छता पाळा, यासारख्या जाहिराती केल्या जात आहेत. याबाबतचे निर्देश केंद्र सरकारने देत जाहिरातीचे तयार बॅनर सर्व महापालिकांना पाठवले असून हेच बॅनर महापालिकांनी प्रसिद्ध केले आहेत. केंद्र सरकारकडून आल्यामुळे हे सर्व बॅनर हिंदी भाषेतून आहेत.
मात्र सुरुवातीपासून मनसेने मराठीच्या प्रचार प्रसाराचा मुद्दा हाती घेतला असताना पालिकेकडून जनजागृतीसाठी लावण्यात आलेले पोष्टर्स भित्तीपत्रके आणि भिंतीवरील पेटिंग देखील हिंदीतून असल्याने मनसेने या जनजागृती जाहीरातीना विरोध केला आहे. महाराष्ट्राच्या राजभाषेतून म्हणजेच मराठीतूनच हे बॅनर असावेत, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
मात्र वारंवार मागणी करूनही पालिकेकडून हे पोस्टर्स बॅनर बदलण्यात आलेले नाहीत. अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या जाहिरात फलकावर काळे फासून निषेध व्यक्त करत पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता त्यांनी हे पोस्टर्स केंद्र सरकारकडून धाडण्यात आल्याने ते हिंदीतून होते. जनजागृतीचे पोस्टर्स असल्यामुळे आम्ही ते प्रसिद्ध केले आहेत.
मात्र महाराष्ट्रात मराठीचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही पोस्टर्सवरील भाषा बदलून नवे पोस्टर्स लवकरच लावू .मात्र कोणीही त्या पोस्टर्सबरोबर छेडछाड करत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App