विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे शिवतीर्थ या आपल्या नव्या घरात महाराष्ट्राची मोहीम सुरू करणार आहेत/ येत्या सहा डिसेंबर पासून ते महाराष्ट्राच्या दौर्यावर निघत असून आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात ते मनसेची पक्षबांधणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सहा विभागांमध्ये जाऊन बैठका घेणार आहेत. यातली पहिली बैठक पुण्यात सहा डिसेंबर रोजी असून 14 ते 16 डिसेंबर ते मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. 16 डिसेंबर रोजी ते पुन्हा एकदा पुण्यात येऊन पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बैठक घेणार आहेत. MNS chief raj Thackeray will be on Maharashtra political tour from 6 th, may allies with BJP
त्याच बरोबर महापालिका निवडणुकांमध्ये नवा मित्र म्हणून भारतीय जनता पार्टीशी देखील मनसेची युती करण्याचा मनसूबा आहे. या दोन पक्षांची युती होणे हे महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांसाठी नवे आव्हान असणार आहे. भाजपची महाराष्ट्रातली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मनसेची ताकद सुप्त अवस्थेत आहे.
त्याचवेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बद्दल नाराजी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. काही मंत्र्यांना तुरुंगात जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्यासाठी बेरजेचे मतांचे राजकारण म्हणून दोन्ही पक्षांच्या युतीकडे पाहिले जात आहे.
शिवसेनेशी युती तुटल्यानंतर भाजपने आपला राजकीय पाया विस्तारण्याची संधी घेऊन केव्हाच सुरुवात केली आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना मनसेसारख्या छोट्या घटक पक्षांची जोड मिळाली तर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांवर मात करता येऊ शकेल, असा भाजपचा नेत्यांचा होरा आहे. त्याचबरोबर मनसेला देखील भाजपशी युती केल्याने महाराष्ट्रात राजकीय संजीवनी मिळू शकते असा मनसेचा नेत्यांचा होरा आहे. या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ या नव्या निवासस्थानातून सुरु करणार असलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र मोहीम पुढे कशी सरकते आणि गाजते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App