वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत मनसेने कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा केला. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही मुंबईतील मातोश्री बंगल्यासमोर मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. MNS activist dahihandi broken in front of ‘Matoshri’ bungalow of CM ddhav Thackeray
मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी रात्रीपासून ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला. ठाण्यात जन्माष्टमीचे औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. त्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोरच मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडली. मनसेच्या कार्यकर्त्याने अखिल चित्रे यांना खांद्यावर बसवले आणि दहीहंडी फोडली. त्यानंतर घोषणाबाजी करून कार्यकर्ते निघून गेले.
मुंबईत ४ ठिकाणी गुन्हे दाखल
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीतीच्या निर्बंधांमुळे सार्वजनिक उत्सवांना राज्य सरकारने बंदी घातली. मात्र, निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा आणि मनसेची काही गोविंदा पथके सज्ज झाली होती. पोलिसांनी कोरोनाचे नियम तोडून दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर मुंबईत चार ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. कस्तुरबा मार्ग, घाटकोपर, वरळी, काळाचौकी ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App