विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Gaikwad हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या ठाकरे बंधूंवर टीका करताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका होत आहे.Sanjay Gaikwad
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे बोलताना गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.
मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, विषय फक्त हिंदीचा नाही, जगात आज टिकायचे असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या. ते मुर्ख होते का? शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काही मूर्ख होते का? असे आक्षेपार्ह शब्द संजय गायकवाड यांनी वापरले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संजय गायकवाड म्हणाले, आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे. तसेच जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App