विदर्भातले काँग्रेस उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षाला धक्का; आमदार राजू पारवे शिवसेनेत दाखल!!

MLA Raju Devnath Parwe who resigned from Congress earlier today, joined Shiv Sena

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीतले विदर्भातले 5 उमेदवार काँग्रेसने जाहीर केल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांना रामटेक मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी मिळणार आहे. कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून एकनाथ शिंदे राजू पारवे यांना तिकीट देणार आहेत. MLA Raju Devnath Parwe who resigned from Congress earlier today, joined Shiv Sena

राजू पारवे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य बरोबरच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. पण ही घटना तेव्हा घडली, ज्यावेळी काँग्रेसने विदर्भातले 5 उमेदवार जाहीर करून लोकसभा निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतली. राजू पारवे यांच्या पाठोपाठ आणखी काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज दाखल झाले. राजू पारवे हे शिवसेनेच्या तिकीटावर रामटेक लोकसभेची जागा लढवणार आहेत.

देशाचे लोकमान्य नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. सोबतच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली. आता मी महायुतीसोबत काम करणार आहे. मी या सर्व नेत्यांचे आभार मानतो, असे राजू पारवे यांनी सांगितले.

सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला’

विकासाचे राजकारण महत्त्वाचे आहे. आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे. रामटेक मतदारसंघाचा विकास कसा होईल, यासाठी माझं काम असलं पाहिजे. मी सात महिने बाकी असताना माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून काम करण्याची माझी इच्छा आहे. मी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. रामटेकबद्दल कमिटमेंट झालं आहे. रामटेकची लोकसभेची जागा मी लढणार आहे, अशी माहिती राजू पारवे यांनी दिली.

MLA Raju Devnath Parwe who resigned from Congress earlier today, joined Shiv Sena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात