प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यातील परिचारिकांनी शनिवारपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून शिकाऊ परिचारिका आणि डॉक्टर्स यांच्या मदतीने काम सुरळीत पार पाडले जात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे. Mixed response to strike of nurses in Maharashtra; But the workload on the trainees
शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
मुंबईत जे.जे. रुग्णालयात दैनंदिन 100 शस्त्रक्रियांपैकी केवळ 23 अत्यावश्यक शस्त्रक्रिया संध्याकाळपर्यंत करण्यात आल्या आहेत. जे.जे. रुग्णालयाशी संलग्न जी.टी. आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात अंदाजे 30 ते 40 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे पहायला मिळत आहे.
रुग्णालय प्रशासनाची माहिती
जे.जे. रुग्णालयातून 765, सेंट जॉर्जेसमधील 141 तर जी.टी. रुग्णालयातील 146 परिचारिकांनी संपात सहभाग नोंदवला आहे. तत्कालीन शस्त्रक्रिया रुग्णालयात पार पाडल्या जात आहेत. उर्वरित शस्त्रक्रिया किमान पाच दिवसांसाठी पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App