प्रतिनिधी
पुणे : Minister Patil महायुती सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर केली. मात्र, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे कॉलेजला अचानक भेट देऊन मुलींना फीमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. लवकरच राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.Minister Patil
उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य सरकारने व्यवसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एकूण ८४२ अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूदही केली. या निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने दिशानिर्देशदेखील जारी केले होते. तसेच उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती. सदर निर्णयाचा आतापर्यंत किती विद्यार्थिनींना लाभ झाला याचा प्रत्यक्ष आढावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
कमवा – शिका योजनेतील भत्ता वाढवण्याचा प्रयत्न
राज्यभरातील शंभर कॉलेजांना अचानक भेट देऊन मुलींच्या फीमाफीचा आढावा घेणार असून मुंबईतील वांद्रे येथील थडोमल शहानी कॉलेजपासून या मोहिमेला सुरुवात केली. पुण्यातील गरवारे दुसरे कॉलेज असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांचा भत्तावाढीची मागणी झाली तेव्हा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. या वेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App