प्रतिनिधी
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.Mharashtra assembly mansoon session 2021; 12 BJP MLA suspended for one year
हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना उपाध्यक्षांच्या दालनात अपशब्द वापरल्याचा आरोप काही सदस्यांवर होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदनात खुलासा केला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्रमकपणे आपली बाजू मांडली. भाजपच्या आमदारांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्याचे त्यांनी सदनात सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App