म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा संताप; जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने


वृत्तसंस्था

मुंबई : म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. Mhada Recruitment Paper Leak protest

आरोग्य विभागापाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आले आहे. यातले मराठवाडा कनेक्शन पुन्हा समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एकाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती.आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Mhada Recruitment Paper Leak protest

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*