फडणवीस सरकारमध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!

Meghna bordikar

नाशिक : फडणवीस सरकार मध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!, असला प्रकार फडणवीस सरकार मधल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समोर आणला. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे विधवा महिलांना देण्यात अडथळा आणणाऱ्या ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा मेघना बोर्डीकर यांनी वापरली होती. पण त्या कार्यक्रमाचा अर्धवट व्हिडिओ अजित पवारांच्या नेत्याने आमदार रोहित पवारांना दिला, असा धक्कादायक खुलासा मेघना बोर्डीकर यांनी केला. बोर्डीकरांनी पवार संस्कारितांना expose केले.Meghna bordikar exposed Nexus between two NCPs indefining BJP ministers

मेघना बोर्डीकर यांचा संबंधित व्हिडिओ रोहित पवारांनी सोशल मीडियावर शेअर करून फडणवीस साहेब या मंत्र्यांना आवरा, अशी पोस्ट लिहिली होती. परंतु मेघना बोर्डीकर यांनी त्या व्हिडिओचे सगळे सत्य बाहेर आणून पवार संस्कारित किती खालच्या दर्जाचे राजकारण करतात हे उघड्यावर आणले. मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ त्यांच्या विरोधात जिंतूर विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार विजय भांबळे यांनीच रोहित पवारांना शेअर केला होता. मेघना बोर्डीकर यांनी हे सत्य सूचक पद्धतीने सांगितले. विजय भांबळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिंतूर मध्ये उमेदवार होते, पण मेघना बोर्डीकरांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर विजय भांबळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत शिरले पण त्यांचे मूळ काड्या करायचे गुण गेले नाहीत म्हणून त्यांनी मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याच्या धमकीचा अर्धवट व्हिडिओ रोहित पवारांना शेअर केला.



यातून मेघना बोर्डीकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी आतून कशा एकच आहेत आणि फडणवीस सरकारमध्ये राहून सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या मंत्र्यांना कसे बदनाम करायला पुढे सरकलेत हे दाखवून दिले. रोहित पवारांना नेता बनायची घाई झाली आहे म्हणून ते असले “उद्योग” करतात, असा टोला त्यांनी हाणला. मेघना बोर्डीकर यांच्या या खुलाशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांना काय सुनावतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीची जुनी सवय

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मूळात ही जुनी सवय आहे. पवार जिथे जातील, तिथे कुरतडून खातील, हे त्यांचे राजकारण त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार मध्ये असताना देखील चालविले होते. काँग्रेस पक्ष कुरतडून आणि पोखरूनच त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा केला. आता काँग्रेसमध्ये कुरतडण्यासारखे आणि पोखरण्यासारखे काही राहिले नाही. त्यामुळे पवार संस्कारित नेते भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसले. भाजपने सुद्धा केंद्रीय राजकारणाच्या सोयीसाठी आणि मोदी – पवारांच्या गुळपीठासाठी राष्ट्रवादीवाल्यांना सत्तेच्या वळचणीला जवळ घेतले. पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसून देखील राष्ट्रवादीने “पवार संस्कार” सोडला नाही. त्यांनी भाजपच्या नेत्यांची बदनामी व्हावी असे “उद्योग” सुरू केले. मेघना बोर्डीकर यांच्या अर्धवट व्हिडिओ शेअर करून त्यांची बदनामी करण्याच्या प्रकारातून पवारांचे मूळ कुरतडी आणि पोखरी संस्कारच उघड्यावर आले.

Meghna bordikar exposed Nexus between two NCPs indefining BJP ministers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात