विशेष प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आज सायंकाळी दाखल होत आहेत. आज रात्री आठ वाजता शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील असणार आहेत. स्वतः संजय राऊत यांनी दिल्लीत ही माहिती दिली. meeting between West Bengal Chief Minister and Maharashtra Cabinet Minister Aditya Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जी यांची भेट घेऊ शकणार नाहीत, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सकाळीच स्पष्ट केले होते. परंतु त्यावेळी शिवसेनेच्या वतीने नेमके कोण भेटणार?, हे सांगितले नव्हते दुपारी संजय राऊत यांनी याबाबत खुलासा करुन आदित्य ठाकरे हे आज रात्री आठ वाजता ममता बॅनर्जी यांची भेट घेतील. त्यांच्यासमवेत मी असेन, असे सांगितले.
A meeting between West Bengal Chief Minister and Maharashtra Cabinet Minister Aditya Thackeray will take place in Mumbai today at 8pm. I will also join the meeting: Shiv Sena leader Sanjay Raut (File pic) pic.twitter.com/pVxlulD9fy — ANI (@ANI) November 30, 2021
A meeting between West Bengal Chief Minister and Maharashtra Cabinet Minister Aditya Thackeray will take place in Mumbai today at 8pm. I will also join the meeting: Shiv Sena leader Sanjay Raut
(File pic) pic.twitter.com/pVxlulD9fy
— ANI (@ANI) November 30, 2021
उद्धव ठाकरे स्वतः भेटणार नसताना त्यांच्या ऐवजी आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या वतीने भेट घेणार आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे. शिवसेनेतला नंबर 2 पक्का झाला आहे. शिवाय संजय राऊत हे त्यांच्या समवेत असल्याने “राजकीय पाय इकडे तिकडे” पडण्याची शक्यता नाही. आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रोटोकॉल देखील पाळला जाईल आणि शिवसेनेत राजकीय संदेश देखील पोहोचेल.
स्वतः उद्धव ठाकरे भेटणार नसल्यामुळे विरोधी ऐक्यावर फारसा ठोस निर्णय होण्याची अपेक्षा नाही. परंतु अगदीच कोणी भेटले नाही असेही दाखवता येणार नसल्याने आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर सदिच्छा भेट असल्याचे सांगता येऊ शकेल. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी स्वतःहून आदित्य ठाकरे यांच्याकडे काही राजकीय प्रस्ताव दिला तर ते स्वतः निर्णय घेऊ शकणार नाहीत पण तो अर्थातच आपल्या पिताश्रींकडे ते पोहोचवू शकतील. यातून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून विशिष्ट राजकीय वर्चस्व अबाधित राहील आणि ममता बॅनर्जी यांच्याशी ते बरोबर येणे किंबहुना एक पायरी वर राहून देखील वाटाघाटी करू शकतील, असा शिवसेनेचा राजकीय होरा असू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना पुढे करून ममता बॅनर्जी यांची भेट घ्यायला लावण्यात येत आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App