विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी एक आवाहन केलेय. ते म्हणाले की , फक्त मागण्या करण्याऐवजी त्या पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) सादर करावा.जेणे करून पाठपुरावा करणे शक्य होईल. आता सरकारच्या हातात फक्त ९३५ दिवस शिल्लक आहेत.Meet with projects, don’t just discuss, now the government has only 935 days left: Dr. Karad
जालनारोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील सर्व उद्योग संस्थांतर्फे आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कराड म्हणाले, आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल.
आजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर करून घेतली. पुढे ते म्हणाले की औरंगाबाद ते पुणे रेल्वेचे सर्वेक्षण, मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरण पाठपुरावा, विभागीय जेरियाट्रीक सेंटर, एम्स हॉस्पिटल, कन्व्हेन्शन सेंटर आणि मोठ्या आयटी पार्कसाठी मागणी केलेली आहे.
त्यासह पायाभूत सुविधा, उद्योग, व्यापार, रेल्वे आणि इतर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. इथून पुढे एक एक दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रत्येक दिवसांत शहर आणि जिल्ह्याच्या पदरात योजना आणण्याची जबाबदारी माझ्यासह सर्वांची आहे.
रडारसाठी पाठपुरावा केला
डॉ .कराड म्हणाले की हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी रडारसाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेण्यात आले आहे . तसेच रडारमुळे शहरापासून राज्यातील ५०० किलोमीटर अंतरावर हवामानाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. जी कामे असतील ती योग्य पद्धतीने अहवाल सादर करून करता येतील.
ऑरिकमध्ये आयटीपार्कसाठी पाठपुरावा करावा
डॉ. कराड यांनी ऑरिक सिटीमध्ये दोन आयटी पार्क येण्यासाठी पाठपुरावा करावा. ऑरिकमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्रातील अँकर प्रोजेक्ट आणावा, अशी मागणी आमदार सावे यांनी केली.दरम्यान आमदार बागडे म्हणाले, कराड यांनी जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापाराला बळकटी द्यावी. चॅटर्जी म्हणाले, पुढील ३० वर्षांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटमध्ये प्रामुख्याने उद्योग, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण घटकांवर भर देणे गरजेचे आहे.
डॉ. कराड यांच्याकडून कोणत्या अपेक्षा
ऑरिकचे जागतिक स्तरावर मार्केटिंग करून अँकर प्रोजेक्ट आणणे, बिडकीन येथील मेडिसिन पार्कचे काम सुरू करणे, डिफेन्स क्लस्टर कार्यान्वित करणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट सुरू करणे,
आयआयटी, एम्स हॉस्पिटल, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम पूर्ण करण्याच्या अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्याकडून असल्याचे आज चर्चासत्रात समोर आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App