महाराष्ट्रातल्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नवे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर करणार

वृत्तसंस्था

मुंबई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. परीक्षांचे नवे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर करण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार होत्या. medical exams postponed in maharashtra

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढू लागल्याने राज्यसह देशभरातील विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर अखेर सरकारी पातळीवर हालचाली झाल्या आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.



वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ योग्य वेळी जाहीर करेल, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.

या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

medical exams postponed in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात