शेंडी जाणव्याचे असे कोणते वेगळे हिंदुत्व नाही, हिंदू धर्मात असे अनेक समाज पंथ आहेत ज्यात…’ असंही म्हणाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मनुस्मृतीवरून ब्राह्मण समाजाला वारंवार लक्ष्य केलं जाणं, ब्राह्मणांवर टीका केली जाणे हे आजकाल उघडपणे होत आहे. समाजात फूट पाडणाऱ्या व्यक्तींकडू जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजाबद्दल अन्य समाजाच्या मनात गैरसमज निर्माण केला जात आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी परखड शब्दांमध्ये मत मांडत, अशा टीकाकरांचे कान टोचले आहेत. Medha Kulkarni criticizes those who blame the Brahmins on Manusmriti
छत्रपती संभाजीगर येथे आयोजित अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या ब्राह्मण अधिवेशनात बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आजकाल आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी विनाकरण उठसूट ब्राह्मणांना दोष दिला जातो, हे थांबवा. मनुस्मृती फाडली, जाळली जाते. मात्र हे केल्याने काय फरक पडणार आहे? मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध, ती जेव्हा लिहिली गेली तेव्हा केवळ एकट्याच ब्राह्मणाने ती लिहिलेली नाही. जे जे मनू होऊन गेले ते सर्व ब्राह्मणच होते, यावर विश्वास असण्याचे कारण नाही. शेवटी त्यामधील जे काही चांगलं आहे ते आपण घेतलं पाहीजे आणि वाईटवर सर्वांनी मिळून टीका करूयात.
छत्रपती संभाजीनगरातील तापडीया नाट्यमंदिर येथे हे अधिवेशन पार पडले, यासाठी राज्यभरातून मोठ्यासंख्येन ब्रह्मवृंद उपस्थित होते. याप्रसंगी मेधा कुलकर्णी यांचा खासदार झाल्याबद्दल समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजावर विविध मुद्य्यांवरून राजकीय पोळी भाजण्याच्या हेतून होणाऱ्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली, आता हत्या करणारा एक ब्राह्मण होता म्हणून सर्व समाज दोषी का? परंतु या घटनेनंतर संपूर्ण ब्राह्मण समाजावर राग काढण्यात आला. अजूनही विरोधी राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी समाजात द्वेष भावना निर्माण करून, ब्राह्मणांवर टीका करत आहेत. हे किती दिवस सहन करायचे, हे थांबायलाच हवं.
तसेच शेंडी जाणव्याचे असे कोणते वेगळे हिंदुत्व नाही. हिंदू धर्मात असे अनेक समाज पंथ आहेत ज्यात विधी संस्कार, म्हणून शेंडी ठेवली जाते आणि जाणवे घातले जाते. केवळ एकटा ब्राह्मण समाजच नाही. मात्र समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या अशा राजकारणी मनोवृत्तीला कायम मिटवल पाहीजे, असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हणत उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख न करता त्यांना टोला लगावल्याचे दिसून आले. याचबरोबर हिंदू धर्मात सर्वच जातीपंथांचा समावेश होतो, आपण सर्वजण आधी हिंदू आणि नंतर ब्राह्मण, मराठा व विविध जातीपंथातील आहोत, हे लक्षात घ्याव आणि हिंदू धर्म रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावं असंही मेधा कुलकर्णी यांन यावेळी आवाहन केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App