मागच्या वर्षी देखील साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देण्यात आला होता. Mayor Mohol gave unique support to ‘this’ families in Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : यंदाच्या दिवाळीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जवळपास पाच हजार कुटूंबियांना फराळ देऊन आधार देण्याचा प्रयत्न महापौर मोहोळ यांच्याकडून केला गेला आहे.मागच्या वर्षी देखील साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देण्यात आला होता.
यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की , गेल्या दीड ते पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटुंबांवर दुःखाचे सावट पसरले होते. ज्यांनी ज्यांनी कुटूंबियांतील सदस्य कोरोणामुळे गमावले, त्यांचे आपण दुःख कमी करू शकलो नाही तरी अशा कुटूंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दिवाळी संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत.’
पुढे मोहोळ म्हणाले की , आपल्या हिंदू संस्कृतीत अशी प्रथा आहे की , जर कुटूंबियांतील एखादा सदस्य मृत्यू पावला तर जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात सगळीकडेच नकारात्मक वातावरणात निर्माण झाले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर नाहीसा करून आनंदाची नवी पहाट अशा कुटूंबियांमध्ये आणणे आवश्यक होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App