नवाब मलिकांच्या मुलाचा फ्रेंच महिलेशी विवाह, विवाहाचे बोगस प्रमाणपत्र; फसवणूक आणि बोगस दस्तऐवजाचा गुन्हा दाखल


प्रतिनिधी

मुंबई : दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रींग घोटाळा करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयाच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. नवाब मलिक यांचा मुलगा आणि सून यांच्यावर पोलीसांनी कुर्ला पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. Marriage of Nawab Malik’s son with a French woman

नेमके प्रकरण काय? 

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने कडून हा गुन्हा दाखल केला आहे. परदेशात जाण्याकरीता व्हिसासाठी बोगस विवाह प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराज मलिक आणि हँमलिन असे गुन्हा दाखल झालेल्या नवाब मलिक यांच्या मुलाचे आणि सुनेचे नाव आहे. फराज मलिक हा यापूर्वी देखील अनेक वादात अडकला असून यापूर्वी देखील त्याच्यावर कुर्ला पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र मंगळवारी रात्री दाखल झालेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून या गुन्ह्यात फराज आणि त्याच्या पत्नीला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

फराज मलिक याने फ्रान्सची नागरिक असणाऱ्या हँमलिन हिच्याशी विवाह केला आहे. फराज आणि त्याच्या पत्नीला परदेशात जाण्यासाठी त्याने व्हिसासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्याने विवाह प्रमाणपत्र जोडले होते, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा पासपोर्ट विभागाकडे त्याने जोडलेले कागदपत्रे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या कागद पत्रासोबत जोडलेले विवाह प्रमाणपत्राबाबत विशेष शाखेच्या अधिकारी यांनी महापालिकेच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता हे विवाह प्रमाणपत्र आम्ही दिलेले नसल्याचे विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांना संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडकीस येताच विशेष शाखेच्या अधिकारी यांनी मंगळवारी कुर्ला पोलीस ठाण्यात फराज मलिक आणि त्याची पत्नी हँमलिन या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली, अशी माहिती कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे यांनी दिली.

याप्रकरणी फराज मलिक आणि त्याची पत्नी हँमलिन या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) ४६५, ४६८,४७१(बोगस दस्तावेज) ३४(सह) आणि कलम १४ विदेशी व्यक्ती अधिनियम कायदा १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांनी सादर केलेली कागदपत्रे तपासण्यात येत असल्याची माहितीही रवींद्र होवाळे यांनी दिली.

Marriage of Nawab Malik’s son with a French woman

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात