विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर केलेले मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर महाराष्ट्रात 24 फेब्रुवारी असून मराठा आरक्षण कायदा लागू झाला असून मराठा समाजाला 10 % शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण मिळाले आहे. Maratha reservation in Maharashtra effective from February 26; Gazette issued with government decision!!
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू होणार. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले.
यापूर्वी विधिमंडळाने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले होते. त्यावर कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनीन सही केली आहे. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले.
SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सचिव सतीश वाघोले यांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जारी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला आनंद आहे. मी शपथ घेतलेली पूर्ण केली. मराठा समाजाला आरक्षण लागू झाले. जीआर निघाला आहे. याचा फायदा मराठा तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल. याचे समाधान सरकार आणि मला आहे. या निर्णयाचा फायदा मराठा समाजाने घ्यावा.
शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी बोललो होतो ते पूर्ण केले. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा आनंद आहे, असे शिंदे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App