विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विमानतळावर उतरलेल्या तीन केनियन स्त्रियांनी कस्टम ड्यूटी चुकवण्यासाठी तब्बल 937.78 ग्रँम सोने त्यांच्या ‘प्रायव्हेट पार्ट’मध्ये लपवून आणले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दक्ष कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघड झालीच. या महिलांना मग त्यांनी लपवून आणलेल्या सोन्यासह ताब्यात घेण्यात आले. त्या दोहा येथून आल्या होत्या.Many Airline passengers always come up with tricks to evade custom duty. Three women who came to Mumbai from Kenya did same and tried to smuggle one kg of gold. But…
खुरेशा अली (वय ६१), अब्दुल्लाही अब्दिया अदान (४३) व अली सादिया अल्लो (४५) अशी या ती महिलांची नावे आहेत. त्यांनी सोन्याच्या बिस्किटांचे तुकडे त्यांच्या ‘प्रायव्हेट पार्ट्स’मध्ये लपवले होते. वैद्यकीय तपासणी करून ते काढण्यात आले. अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) ही कारवाई करून या तिघींना केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात दिले आहे.
तीन केनियन महिला अंमली पदार्थ घेऊन मुंबई विमानतळावर उतरणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानुसार एनसीबीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. मात्र, अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे आक्षेपार्ह काही मिळाले नाही. तपासणीवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले.
वैद्यकीय तपासणी केली असता योनीत आणि पार्श्वभागात पाकिटे लपवल्याचे उघड झाले. उपचार करून तेरा पाकिटे काढण्यात आली. प्रत्येक पाकिटात 20 ते शंभर ग्रँम सोने होते. एकूण त्यात सतरा तोळ्याच्या सोन्याचे तुकडे सापडले. हे सोने जप्त करुन पुढील कारवाईसाठी कस्टम विभागाकडे सुपुर्द करण्यात आले. दहा दिवसांपूर्वीच एनसीबीने एका परदेशी नागरिकाला पकडून त्याने पोटात लपवलेले तब्बल दहा कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App