प्रतिनिधी
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या परीक्षेत मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध दर्शवणारे प्रश्न समाविष्ट होते. 12 जुलै रोजी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र. 2 (अ) मध्ये शिवाजी महाराजांच्या राजनीतीत समर्थ रामदासांचे योगदान सांगा, तसेच प्रश्न क्र. ३ (ई) मध्ये मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा हे प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा वाद पेटला.’Manusmriti’ in open university exams, wrong questions from Ramdas, controversial decision to omit controversial part from syllabus
प्रागतिक विचारांचे यशवंतराव चव्हाण यांचे नाव असलेल्या मुक्त विद्यापीठात भारतीय संविधानविरोधी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेटच झाली नसल्याचे अनेक इतिहास संशोधकांनी व न्यायालयाने दिलेल्या निकालातही नमूद असताना विद्यापीठाने मनुस्मृतीचे उदात्तीकरण अन् छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची चुकीची माहिती देणाऱ्या या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अभ्यासक्रम समिती रद्द करण्याची मागणी कुलगुरूंकडे करण्यात आली.
नुकसान टाळण्यासाठी मूल्यमापन
दोनही आक्षेपार्ह प्रश्न बाद ठरविण्यात येऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य मूल्यमापन करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. प्रामुख्याने या अभ्यासक्रमातील याबाबतचा आक्षेपार्ह घटक अभ्यासक्रमातून रद्दबातल ठरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सुधारित पुस्तके संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात उपलब्ध करून दिली जातील. सध्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेला हा आक्षेपार्ह घटक त्वरित काढून घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. सुधारित घटक ग्रंथनिर्मिती केंद्रामार्फत लवकरच अपलोड केला जाईल.
चौकशीचे आदेश
संबंधित आक्षेपार्ह प्रश्न काढणारे पेपर सेटर, संपादक, मॉडरेटर यांची माहिती घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. जबाबदारी निश्चित करण्यात येऊन दोषींना निष्काषित करण्याचेही आदेश देण्यात आले. या बैठकीला परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील, नियोजन अधिकारी डॉ. हेमंत राजगुरू, कुलसचिव प्रा.डॉ. देशमुख यांच्यासह मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. प्रवीण घोडेस्वार, मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. सज्जन थूल उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App