विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange वस्तादांनी कोल्हापुरात डाव टाकला तिघांना गळाला लावले, अशा बातम्यांची भरमार मराठी माध्यमांनी केली असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीतल्या सर्वांत नव्या खेळाडूकडे कुठल्याच नाराजांना नाही जागा; पण पक्ष भरतीसाठी दुसरा पर्यायच नसल्याने सगळ्या नाराजांना वस्तादांचा दरवाजा खुला!! , अशी राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली. Manoj jarange trying new experiment, but sharad pawar harps on old ones
महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यातल्या कुठल्याच नाराज असलेल्या नेत्यांना आपण घेऊ शकत नाही, कारण त्या नाराज नेत्यांना आपल्याकडे घेऊन आपल्याकडच्या इच्छुकांचे काय करू??, असा असा सवाल मनोज जरांगे यांनी कालच केला. महायुती किंवा महाविकास आघाडीतल्या नाराजांना आपल्याकडे जागा नसल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतले सगळ्यात नवे खेळाडू आहेत. निवडणूक लढवायची की नाही याचाही निर्णय अद्याप त्यांनी घेतलेला नाही, पण तरी देखील ते दुसऱ्या पक्षातल्या कुठल्या जुन्या पान्या नाराजांना घेण्यापेक्षा नव्या दमाच्या उमेदवारांसह नवेच डाव टाकण्याच्या विचारात आहेत.
Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
त्या उलट मराठी माध्यमांनी वस्ताद म्हणून नावाजलेल्या शरद पवारांनी मात्र जुन्या पान्या नाराजांना घेऊन आपल्या तुतारीवाल्या पक्षात बळ फुंकण्याचा प्रयत्न चालवला आहे. कोल्हापुरातल्या तीन दिवसांमधल्या दौऱ्यात पहिल्या दिवशी शरद पवारांनी आपले जुनेच समर्थक समरजीत सिंग घाटगे, के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या तिघांना गळाला लावले आहे. यापैकी समरजीत सिंग घाटगे, हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तुतारी फुंकतील, तर दोन पाटलांच्या पवार भेटीतून राधानगरी – भुदरगड मतदारसंघात उमेदवार कोण द्यायचे त्याचा पवारांनी प्रश्न सोडवला आहे. सगळे जुनेच नेते आहेत. त्यांनाच भाजपमधून घेऊन पवार त्यांच्या हाती तुतारी दिली आहे.
मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र एवढ्या प्रचंड भूभागात वस्तादांना डाव टाकायला काही शिल्लकच नाही. त्यांचे डाव फक्त दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सोलापूर, सातारा पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येच सुरू आहेत. ते देखील जुन्याच समर्थकांना गोळा करून आपली पक्ष भरती करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App