मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर टप्प्याटप्प्यावर भूमिका बदलून शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध संघर्ष करणारे मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक पातळीवर टार्गेट करत आता कांशीराम यांच्या भूमिकेत शिरले आहेत. ते स्वतः लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे टाळून इतरांना पाडण्याची भाषा बोलू लागले आहेत. स्वतः प्रत्यक्ष निवडणुकीत उभे राहून इतरांना पाडणे, ही बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांची सुरुवातीची भूमिका होती. मनोज जरांगे यांनी कांशीराम यांचे नाव न घेता तीच भूमिका स्वतः प्रत्यक्ष निवडणुकीत उभे न राहता अवलंबली आहे. Manoj jarange says vote for defeat the ruling combination is like kashiram’s political ideology
कोणतीही पहिली निवडणूक लढवायची, ती केवळ आपल्या अस्तित्व दाखवण्यासाठी. दुसरी निवडणूक लढवायची ती पाडण्यासाठी आणि तिसरी निवडणूक लढवायची ती जिंकण्यासाठी, असे कांशीराम म्हणत असत. याचा अर्थ तीन निवडणुकांमध्ये यशाचा टप्पा गाठावा, असे त्यांचे म्हणणे असे. प्रत्यक्षात त्यांच्या राजकीय हयातीत त्यांना तसे यश फारसे गाठता आले नव्हते, हा भाग अलहिदा. कांशीराम यांचा राजकीय पटलावरून अस्त झाल्यानंतर मायावतींना उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यात संपूर्ण बहुमताचा टप्पा गाठता आला होता. पण तो नंतर मात्र तेवढा टिकवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे.
मनोज जरांगे आज कांशीराम यांच्या भूमिकेत आले आहेत, याचा अर्थ ते प्रत्यक्ष निवडणूक लढवून अस्तित्व दाखवणार आहेत, असा नव्हे, कारण त्यांनी स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरण्याला नकार दिला आहे, इतकेच नाही तर मध्यंतरी मराठा समाजाचे बहुसंख्येने उमेदवार सर्व मतदारसंघांमध्ये उभे करून शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना अडचण निर्माण करायची असे जे घाटत होते, त्या भूमिकेपासूनही मनोज जरांगे मागे हटले. मराठा समाजातले तरुण लोकसभा निवडणुकीत उतरवू नका त्याऐवजी मतदान 100 % करा आणि ज्याला हवा त्याला पाडा, अशी भूमिका जरांगे यांनी जाहीर केली. त्याच भूमिकेचा त्यांनी बीड मधल्या नारायणगडावरून पुनरुच्चार केला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मध्ये देखील त्यांनी तशाच आशयाचे वक्तव्य केले. याचा सरळ अर्थ असा की, मनोज जरांगे यांना शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारला धडा शिकवायचा आहे. मग भले मनोज जरांगे यांनी टप्प्याटप्प्यावर मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका बदलली असेल, तर त्या भूमिकेसमोर मान तुकवून शिंदे – फडणवीस सरकारने चालावे, अशी मनोज जरांगे यांचा हट्ट आहे.
किंबहुना टप्प्याटप्प्यावर मराठा आरक्षणाबाबत टप्प्याटप्प्यावर भूमिका बदलणे याचा हेतूच मूळात शिंदे – फडणवीस सरकारकडून मिळालेले मराठा आरक्षण नाकारणे हा होता. जरांगे यांना मराठा आरक्षण हवे आहे, ते फक्त शरद पवारांकडून. बाकी कोणाकडूनही नको, ही त्यांची छुपी भूमिका आहे. ते फडणवीस यांना थेट विरोध करताना उघडपणे ही भूमिका मांडू शकत नाहीत. कारण तसे असल्यास शरद पवारांचे जातीय राजकारण “एक्स्पोज” होईल.
त्यामुळेच मनोज जरांगे हे मराठा समाजाने मतदान 100 % टक्के करावे आणि ज्याला पाहिजे त्याला पाडावे, अशा कांशीराम यांच्या भूमिकेत ते आज कांशीराम यांचे नाव न घेता आले आहेत. कारण कांशीराम यांचे नाव घेणे हे देखील त्यांना अडचणीचे आहे.
पाडापाडीचे राजकारण जरांगे – पवार साम्य!!
बाकी मतदान 100 % करा आणि ज्याला पाहिजे त्याला पाडा ही मनोज जरांगेंची भूमिका आणि शरद पवारांची मूलभूत राजकारण यात विलक्षण साम्य आहे. कारण शरद पवार देखील आपल्याला हव्या त्या माणसाला निवडून आणण्यापेक्षा नको त्या माणसाला पाडण्यात जास्त ताकद वापरतात, हा त्यांचा राजकीय इतिहास आहे. पवारांनी आपल्या राजकीय हयातीत जेवढी माणसे निवडून आणली, त्यापेक्षा जास्त माणसे पाडली. याची उदाहरणे महाराष्ट्राच्या इतिहासात जागोजागी आढळतात. त्यात विलासराव देशमुख यांच्यापासून अनंतराव थोपटे यांच्यापर्यंतची नावे आढळतात, पण ज्या अनंतराव थोपटेंना पाडून पवारांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही, त्याच अनंतराव थोपटे यांच्या घरी पवारांना आपल्या कन्येच्या निवडणुकीसाठी जावे लागले हा देखील फार जुना इतिहास नसून हे 2024 चे “वर्तमान” आहे, याची मनोज जरांगेंच्या “कांशीरामी” भूमिकेमुळे आठवण झाली, इतकेच!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App