Manoj Jarange जरांगे + मौलाना सज्जाद नोमानी + आनंदराज आंबेडकर एकत्र; किती होईल त्यांचे उपद्रवमूल्य??

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manoj Jarange विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 19 दिवस बाकी असताना मनोज जरांगे, मौलाना सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर आज अंतर्वली सराटी मध्ये एकत्र आले. तिथे त्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत मराठा + मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याची घोषणा केली. पण या घोषणेनंतर त्यांचे एकूण उपद्रव मूल्य किती ठरेल??, याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.Manoj Jarange

कारण मनोज जरांगे यांनी वारंवार तारखांवर तारखा देत अंतिम निर्णय पुढे ढकलत ठेवला होता. आज देखील पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याचा दावा जरूर केला, पण त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली नाही. ती यादी 3 तारखेला जाहीर करू, असे ते म्हणाले त्यामुळे त्यामुळे जरांगे यांच्या उमेदवारांच्या यादीचा निर्णय देखील आणखी 3 दिवस लांबणीवर पडला आहे.

आमचं समीकरण एकमतानं पक्क झालं आहे. येत्या 3 तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. त्याच तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले.


BJP : पवारांनी केली अजितदादांच्या राष्ट्रवादीची फोडाफोडी, पण भाजपची मित्र पक्षांना उमेदवार पुरवठादारी मोठी!!


मनोज जरांगे यांचे समर्थन घेऊन महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमध्ये अनेक उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत, त्यापैकी एका उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय मनोज जरांगे घेणार आहेत. त्यानंतर उरलेल्या सर्व उमेदवारांनी आपले फॉर्म मागे घेऊन स्टार प्रचारक म्हणून काम करायचे असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

पण जरांगे यांच्या पाठिंब्याच्या आधारावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या तरुणांनी फॉर्म मागे घेतले नाही तर काय करणार??, या सवालावर आत्ता तरी जरांगे काही बोलले नाहीत. मराठा समाज, मुस्लिम समाज आणि दलित समाज यांचा दबाव सगळ्या उमेदवारांवर काम करेल, एवढेच त्यांनी सांगितले. बाकी ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आम्ही सोडत नसतो. त्यांना धडा शिकवणार, असा इशारा जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

स्वतः मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. त्यांनी कुठूनही फॉर्म भरलेला नाही, पण त्यांच्याबरोबर आलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी अनेकदा निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. परंतु त्यांना यश मिळालेले नव्हते. मौलाना सज्जाद नोमानी हे देखील स्वतःहून कुठल्या निवडणुकीत उतरलेले नाहीत. त्यांनीही कुठल्या मतदारसंघातून फॉर्म भरून आपले राजकीय नशीब आजमावलेले नाही. त्यामुळे जरांगे, मौलाना सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर एकत्र आले, तर त्यांचे उपद्रवमूल्य नेमके किती होईल??, याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Manoj Jarange, Maulana Sajjad Nomani and Anandraj Ambedkar together

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात