Manoj Jarange माध्यमांनी थेट घडवली मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा; प्रत्यक्षात जरांगे लढवणार 15 – 20 जागा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात प्रचंड गाजावाजा करून मराठा आरक्षण आंदोलन चालवणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतची चर्चा माध्यमांनी घडवली पण प्रत्यक्षात जरांगे मात्र 15 – 20 जागा लढवण्याइतपतच तयारी करू शकले. मनोज जरांगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत 150 जागा लढविण्याची वातावरण निर्मिती केली होती. Manoj Jarange Cm of maharashtra discussion of media

जरांगे यांच्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडणार प्रस्थापित पक्षांना, महायुतीला आणि महाविकास आघाडीला धक्के बसणार वगैरे मखलाशी माध्यमांनी केली. परंतु, प्रत्यक्षातून निवडणूक लढवण्याची वेळ आली, त्यावेळी जरांगेंच्या समोर 25 मतदारसंघांची चर्चा झाली. त्यापैकी 13 मतदारसंघांची घोषणा त्यांनी केली आणि उरलेल्या मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडायची भाषा केली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. Manoj Jarange

मनोज जरांगे यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार? याबाबतची उत्सुकता आहे. मनोज जरांगे रात्री उमेदवारांची घोषणा करणार अशी चर्चा होती. पण मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांसोबत अद्याप चर्चा सुरु आहे. अजून अनेक मतदारसंघांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. असं असलं तरी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रात्रीत किंवा आज सकाळी 7.00 वाजेपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करणार, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

– मनोज जरांगे म्हणाले :

– मोजक्याच जागा लढायचं ठरवलं आहे आणि त्या निवडून आणायचं सुद्धा ठरवलं आहे. आपण 15 ते 20 जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे. Manoj Jarange

“बीड मतदारसंघ लढवण्याचं ठरवलं आहे. केज, मंठा, परतूर, फुलंब्री हे मतदारसंघ लढवायचं ठरवलं आहे. बाकीचे नावं आले नाहीत, तिथे पाडायचं आहे. कन्नड, हिंगोली, वसमत हे लढवायचे ठरवले आहे. पण त्याबाबत चर्चा सुरु आहे. परभणीतील पाथरी, गंगाखेड, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, धाराशिव आणि कळंब लढवण्याचं ठरवलं आहे. दौंड, पर्वती हे सुद्धा लढवण्याचं ठरवलं आहे. पार्थडी, कोपरगाव, पाचोरा, करमाळा, माढा, धुळे शहर, निफाड, नांदगाव या मतदारसंघांवर निवडणूक लढवायची आहे. पण त्याबाबत चर्चा सुरु आहे. Manoj Jarange

– एकूण 25 मतदारसंघांवर चर्चा झाली आहे. उमेदवार जाहीर करायचे राहिले आहेत. आज रात्री किंवा सकाळी उमेदवार जाहीर करु. सकाळी सात वाजेच्या आत आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. कारण उद्या शेवटचा दिवस आहे.

– ज्या मतदारसंघाची नावे येणार नाहीत तर माझी राज्यभरातील मराठा समाजाला विनंती आहे की, तुमच्या मतदारसंघाचं नाव आलं नसेल तर आपले अर्ज काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी 10 ते 5 असेनात, पण निवडून आणायचं आहे. गोरगरीब उमेदवाराला पैशाचा ताकदीवर दमदाटी केली तर आम्ही आमच्या मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचा उमेदवार पाडलाच म्हणून समजावं.

‘या’ मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार

1) केज, बीड जिल्हा

2) परतूर, जालना जिल्हा

3) फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर जिल्हा

4) बीड, बीड जिल्हा

5) हिंगोली, हिंगोली जिल्हा

6) पाथरी, परभणी जिल्हा

7) हदगाव, जिल्हा नांदेड

8) कळंब, जिल्हा धाराशिव

9) भूम-परांडा, जिल्हा धाराशिव

10) दौंड, जिल्हा पुणे

11) करमाळा, जिल्हा सोलापूर

12) निलंगा, जिल्हा लातूर

13) पर्वती, जिल्हा पुणे

Manoj Jarange Cm of maharashtra discussion of media

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात