Mallikarjun Kharge उद्धव ठाकरे + संजय राऊत ट्रेनिंग देतात, पण ट्रेनिंग घेऊन लोक पळून जातात; मविआ जाहीरनामा प्रकाशनात मल्लिकार्जुन खर्गेंचा टोला!!

Mallikarjun Kharge

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांच्या पक्षातल्या लोकांना ट्रेनिंग देतात, पण ट्रेनिंग घेऊन ते लोक बाहेर पळून जातात, असा खणखणीत टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज लगावला. निमित्त होते, महाविकास आघाडीच्या जाहीरनामा प्रकाशनाचे!! या प्रकाशनच्या पत्रकार परिषदेतच खर्गे यांनी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना टोला हाणला.

महायुतीतील सर्वांत मोठा पक्ष भाजपचा जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला. या प्रकाशन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते आणि बाकीच्या नेत्यांच्या हस्ते महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रकाशित केला.


Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला


या प्रकाशन सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना मध्येच मल्लिकार्जुन खर्गे यांनी ठाकरे आणि राऊत यांना टोला आणला त्याचा संदर्भ राज्यघटनेच्या लाल हॅन्डबूकशी होता. राहुल गांधी जे लाल हँडबुक घेऊन फिरतात, ती राज्यघटना नसून ते अर्बन नक्षल्यांचे डॉक्युमेंट असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र तसेच हँडबुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनाथ कोविंद यांना ते राष्ट्रपती झाल्याबरोबर दिले होते. याचा फोटो खर्गे सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी पत्रकारांना दाखविला.

त्यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा संदर्भ देत ते कुठल्या शाळेत शिकलेत माहिती नाही, पण त्यांना आपल्या शाळेत आणा आणि शिकवा, असा खर्गे यांनी सल्ला संजय राऊत यांना दिला. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेवआपल्या लोकांना ट्रेनिंग देतात, पण ते लोक इथले ट्रेनिंग घेऊन बाहेर पळून जातात. तसे होऊ देऊ नका, असा टोला दोन्ही नेत्यांना हाणला.

Mallikarjun Kharge launches the joint manifesto of MVA, ‘Maharashtra Nama

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात