मला उद्धव ठाकरेंना सांगायचे आहे की, तुम्हाला कुठे बसयाचे हे तुम्हालाच ठरवायचे आहे आणि तुम्हीच ठरवलं आहे, असंही अमित शाह म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत भाजप महाविकास आघाडीवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. दरम्यान, केंद्रय गृहमंत्री अमित शाहा यांनी महाराष्ट्रासाठी पक्षाचे संकल्प पत्र प्रसिद्ध केले. यावेळी ते म्हणाले की, आज येथे प्रसिद्ध झालेले संकल्प पत्र हे महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला.
काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले, “मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे की ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांसाठी दोन शब्द बोलण्यास सांगू शकतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ दोन वाक्य बोलू शकतात का? विरोधाभास असताना आघाडीचे सरकार स्थापनेचे स्वप्न घेऊन बाहेर पडलेल्यांची माहिती महाराष्ट्रातील जनतेला मिळाली तर बरे होईल.
ते पुढे म्हणाले, “मला उद्धव ठाकरेंना सांगायचे आहे की, तुम्ही कुठे बसता हे तुम्हीच ठरवायचे आहे. पण मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही 370 ला विरोध करणाऱ्यांसोबत, रामजन्म भूमीला आणि वक्फ बोर्ड सुधारित कायद्याला विरोध करणाऱ्यांसोबत बसलेला आहात. ”
जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहा म्हणाले, “महाराष्ट्र अनेक युगांपासून प्रत्येक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आला आहे. एकेकाळी जेव्हा गरज होती, तेव्हा गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी भक्ती चळवळही महाराष्ट्रातून सुरू झाली होती. शिवाजी महाराजांनी इथून सुरुवात केली, सामाजिक क्रांतीचीही सुरुवात इथूनच झाली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा आमच्या संकल्प पत्रातून दिसून येतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App