अपघातस्थळी नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Gateway of India मुंबईतून एका हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली आहे. पोलिसांनीही या घटनेची माहिती दिली आहे. प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उलटलेल्या बोटीत जवळपास 30 ते 35 प्रवासी होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.Gateway of India
अपघात कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणारी बोट अचानक पाण्यात बुडू लागली. यानंतर बोटीवरील प्रवाशांची जवळच्या बोटीद्वारे सुटका करण्यात येत आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
बचावकार्य सुरूच आहे
समोर आलेल्या माहितीनुसार, एलिफंटा येथे जाणाऱ्या बोटीचे नाव नीलकमल असे होते. उरण, कारंजा येथे ती बुडाली आहे. या बोटीत 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातस्थळी नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि यलोगेट पोलिस स्टेशन 3 आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App