भुजबळांच्या टार्गेटवर आता फक्त अजितदादा; पण अजितदादांचे नियोजन एवढे ढिल्ले, की आणखी काही वेगळे??

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रीपद नाकारलेले 79 वर्षांचे छगन भुजबळ यांनी आपला पवित्रा नाशिक मध्ये आज बदलून फक्त अजितदादांना टार्गेटवर घेतले. दोन दिवस सतत अजित पवार + प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टार्गेट करणारे छगन भुजबळ आज फक्त अजित पवारांवर तोफा डागताना दिसले. माझ्या मंत्रीपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर आग्रही होतेच, पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही तो आग्रह धरल्याची माहिती मला मिळाली, मग माझी अवहेलना करण्यासाठी मला मंत्रीपद नाकारले का??, असा सवाल भुजबळ यांनी अजित पवारांना केला.Chhagan bhulbal now target Ajit pawar

अजित पवारांच्या सगळ्या राजकीय नियोजनाचे वाभाडे भुजबळ यांनी आज नाशिक मधल्या आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात काढले.



सुरुवातीला म्हणे, अजितदादांनी भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायला सांगितली. हा दिल्लीचा निरोप आहे. त्यामुळे तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवावीच लागेल, असे अजितदादांनी भुजबळ यांना सांगितले. भुजबळांनी तशी तयारी चालवली. परंतु, आठवडाभर झाला, तरी त्यांचे नाव लोकसभा उमेदवारांच्या यादीत आलेच नाही. त्यासंदर्भात पुन्हा विचारणा केल्यानंतर अजितदादांनी त्यांना काही उत्तर दिले नाही. शेवटी भुजबळांची लोकसभेची उमेदवारी बारगळली. त्याबद्दल त्यांना अजूनही काही उत्तर मिळाले नाही, असे त्यांनीच सांगितले.

लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार पडल्या. पण त्यांना अजितदादांनी राज्यसभेची संधी दिली. वास्तविक त्यावेळी मला राज्यसभेवर जायचे होते, असे भुजबळ म्हणाले. पण सुनेत्रा पवारांचेच नाव पुढे आल्यानंतर मला गप्प बसणे भाग पडले, असा दावा भुजबळ यांनी केला. राज्यसभेच्या दुसऱ्या जागेवर खरं म्हणजे भाजपचा दावा होता, पण उदयनराजेंसाठी लोकसभा आणि राष्ट्रवादीसाठी राज्यसभा अशी अड्जस्टमेंट भाजपने केली, पण त्या जागेवर मला न पाठवता साताऱ्यातल्या नितीन पाटलांना पाठवले, असे भुजबळांनी सांगितले.

मी येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायला तयार नसताना मला अजितदादांनी विधानसभेची निवडणूक लढवायला लावली. मनोज जरांगे यांच्यासारख्या असा विरोध असताना मी तिथून निवडून आलो. पण आता नितीन पाटलांच्या भावाला मंत्री करायचे म्हणून मला राज्यसभेवर पाठवायची तयारी अजितदादांनी केली. आमदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जायची तयारी करायला मला सांगितले. ज्यावेळी मला राज्यसभेवर जायचे होते, त्यावेळी जाऊ दिले नाही आणि आता दुसऱ्याला मंत्री करायचे म्हणून मला राज्यसभेवर पाठवायचे असला प्रकार मला मान्य नव्हता, असे भुजबळ म्हणाले.

– अजितदादांचे नियोजन एवढे ढिल्ले??

या सगळ्या प्रकारातून अजितदादांच्या ढिल्ल्या राजकीय नियोजनाचे वाभाडेच त्यांनी काढले. राज्यसभेवर नेमके कोणाला पाठवायचे विधानसभेवर नेमके कोणाला ठेवायचे, याचा विचार अजितदादा ज्या भाजपबरोबरच्या महायुतीत आहेत, त्या भाजपमध्ये किमान दोन – तीन वर्षे आधी केला जातो. पण अजितदादांनी भुजबळांना “खेळवताना” एवढे ढिल्ले नियोजन कसे काय केले??

– भुजबळांना रिटायरमेंट कडे ढकलले

वास्तविक अजितदादा सीनियर नेते आहेत. वर्षानुवर्षे ते उपमुख्यमंत्री राहिलेत. त्यांचे राजकीय नियोजन एवढे ढिल्ले असेल, असे वाटत नाही, मग भुजबळांना आपल्या वाटेतून दूर करण्यासाठी त्यांनी हा “खेळ” केला असेल का??, तसे असल्यास आश्चर्य वाटायला नको. जे अजितदादा शरद पवारांना वयाचे कारण देऊन रिटायर्ड व्हायला सांगतात, ते भुजबळांना वयाच्या कारणास्तव रिटायर्ड करू शकत नाहीत का??, हा या प्रकरणातला कळीचा सवाल आहे. कदाचित या प्रश्नाच्या खऱ्या उत्तरातच भुजबळांना मंत्रिपद नाकारणे आणि त्यावर त्यांची चिडचिड याचे राजकीय रहस्य दडले असावे.

Chhagan bhulbal now target Ajit pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात