या रिक्षाची किंमत २ लाख ९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.तर या इलेक्ट्रीक रिक्षावर राज्याकडून ३० हजार रूपयांची सूट देखील दिली जाणार आहे.Mahindra launches e-autorickshaw, Subhash Desai enjoys rickshaw ride; Appreciated by Anand Mahindra
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महिंद्रा कंपनीने महिंद्रा ट्रेओ ही महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीने महाराष्ट्रात लॉन्च केली. या रिक्षाची किंमत २ लाख ९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.तर या इलेक्ट्रीक रिक्षावर राज्याकडून ३० हजार रूपयांची सूट देखील दिली जाणार आहे.
ई-ऑटोरिक्षाच्या लॉन्चिंगवेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी ही रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला.रिक्षा चालवल्यानंतर त्यांनी ई-रिक्षा चालवलं खूप सोपं आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली होती.
यावेळी महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी देसाईंच्या ड्रायव्हिंगचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी व्हिडिओ शेअर करत एक भन्नाट ऑफर दिली आहे. तसेच त्यांच्या व्हिडिओला रिट्विट देखील केलं आहे.
Subhashji, we need you in @MahindraRacing ! You would look great in our red racing suit as well… @Subhash_Desai https://t.co/WKmsVb2gvB — anand mahindra (@anandmahindra) December 18, 2021
Subhashji, we need you in @MahindraRacing ! You would look great in our red racing suit as well… @Subhash_Desai https://t.co/WKmsVb2gvB
— anand mahindra (@anandmahindra) December 18, 2021
सुभाषजी तुम्ही आम्हाला महिंद्रा रेसिंग स्पर्धेत हवे आहात. तुम्ही लाल रंगाच्या रेसिंग सूटमध्येही खूप छान दिसाल. असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. ट्विटमध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये सुभाष देसाई ई-ऑटो चालवताना दिसत आहेत.आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App