Anand Mahindra Tells How to Stop Corona in Maharashtra

Anand Mahindra Tells How to Stop Corona in Maharashtra : महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार करण्यासाठी काय करावे लागेल?, आनंद महिंद्रांनी सांगितली नामी उपाय!

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहून चिंता व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या एका ट्विटद्वारे महाराष्ट्रात कोरोनाला अटकाव कसा करता येईल यासाठी खास उपाय सुचवला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत, ही मोठी चिंतेची बाब आहे. कोरोनाला थांबविण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, लॉकडाउन लादण्याऐवजी लसीकरणावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. Anand Mahindra Tells How to Stop Corona in Maharashtra


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहून चिंता व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या एका ट्विटद्वारे महाराष्ट्रात कोरोनाला अटकाव कसा करता येईल यासाठी खास उपाय सुचवला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत, ही मोठी चिंतेची बाब आहे. कोरोनाला थांबविण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, लॉकडाउन लादण्याऐवजी लसीकरणावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात नवीन निर्बंधांच्या अंमलबजावणीविषयीची एक बातमी शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिले की, कोरोनाच्या देशातील एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र देशातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. कठोर बंदी किंवा लॉकडाऊनमुळे राज्यावर विपरीत आर्थिक परिणाम होतील. यासाठी प्रत्येक इच्छुक व्यक्तीला महाराष्ट्रात लस दिली जावी. त्याकरिता आपत्कालीन परवानगीही देण्यात येऊन लसीकरण अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे मला वाटते. माझ्या माहितीनुसार, देशात लसीची कमतरता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांनाही टॅग केले आहे. महाराष्ट्रातील कोरोना चाचणीला वेग देण्याच्या ट्विटरवरील वापरकर्त्याच्या सल्ल्यावर आनंद महिंद्रा यांनी लसीकरणालाही वेग देण्याचे म्हटले आहे. आनंद महिंद्रा म्हणाले की, मी चाचणी वेग वाढवण्यासही सहमत आहे, परंतु लसीकरण होईपर्यंत आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या, कदाचित तिसऱ्या किंवा चौथ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

Anand Mahindra Tells How to Stop Corona in Maharashtra

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*