प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान, शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

mahesh manjrekar diagnosed with urinary bladder cancer better health after surgery

mahesh manjrekar : दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. मांजरेकरांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. यानंतर त्यांना मुंबईच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. mahesh manjrekar diagnosed with urinary bladder cancer better health after surgery


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. मांजरेकरांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. यानंतर त्यांना मुंबईच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शस्त्रक्रियेनंतर महेश मांजरेकर यांनी म्हटले की, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. महेश मांजरेकर यांना 10 दिवसांपूर्वी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कर्करोग असूनही महेश मांजरेकर त्यांच्या व्यावसायिक आघाडीवर खूप सक्रिय होते. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ‘1962 : द वॉर इन द हिल्स’ या वेब सिरीजमध्ये ते नुकतेच झळकले होते. यामध्ये अभय देओलचीही भूमिका होती.

बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन

महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन होस्ट करणार आहेत. याआधीही शोचे दोन्ही सीझन त्यांनी होस्ट केले होते. बिग बॉस मराठी काही दिवसांत रिलीज होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

महेश मांजरेकरांनी त्यांच्या काही चित्रपटांमध्ये निवडक भूमिका साकारून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. कांटे, वास्तव, अस्तित्व, विरुद्ध, दबंग, सिंघम रिटर्न्स, संजू या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांचे रसिकांनी भरभरून कौतुक केले. महेश मांजरेकर यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांना मराठीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

mahesh manjrekar diagnosed with urinary bladder cancer better health after surgery

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात