विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. तत्पूर्वी विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला गेला. त्यानंतर सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली.Mahayuti’s press conference before the Assembly Session, Fadnavis’ attack, Shinde’s warning to Thackeray, Ajit Dada also challenged
पत्रकार परिषदेतील फडणवीसांचे ठळक मुद्दे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खोट बोल पण रेटून बोल, असे खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीत यश मिळाले तर आता खोटेच बोलायचे आहे. अशी मानसिकता व अर्विभाव हा विरोधकांचा आहे. किंबहुना त्यांनी दिलेले पत्राचे एका वाक्यात उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात त्यांचा चेहरा पाहावा’, असे ते म्हणाले. विदर्भातील सिंचन प्रश्नावर सरकारवर अपयश, असे म्हणतात. पण हे अपयश हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहे. मध्यंतरी सरकारमध्ये पैनगंगा प्रकल्पाचे फाईल हलली नाही. त्यांच्या काळात विदर्भातील एका प्रकाल्पाला मान्यता दिली नाही. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले पण आम्ही स्वत: त्याला प्रस्ताव देऊन चालू केले. ते आम्हाला विचारतात. वॉटर ग्रीडचे काय झाले. पण त्यांनीच या मराठवाड्यातील वॉटर ग्रीड रोखले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता नीट पेपरफुटीवरून विरोधक आम्हाला बोलत आहेत. पण विरोधकांना हे माहित नसेल की, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच सर्वाधिक पेपरफुटीचे प्रकरण घडले. त्याच्यात गुंतवणूकदारांकडून महाराष्ट्कराकजे पाठ फिरवल्याचे सांगतात. पण त्यांना विसरतात की, तीन नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पहिल्या क्रमांकावर आले आहे.
ड्रग्जच्या विरोधात आम्ही लढाई सुरू केली. संपूर्ण देशात लढाई सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात ही कारवाई होऊ लागली आहे. त्यामुळे ही कारवाई थांबणार नाही. कायदा सुव्यवस्था असो की झीरो टॉलरन्स धोरण ठेवून ड्रग्जवर कारवाई होत आहे. अनेक विषय विरोधी पक्षाने मांडले. पण जितक्या वेळा ते बोट आमच्याकडे उगारतात पण तितक्या वेळा चार बोट यांच्याकडे होतात. खिचडी घोटाळा, मृतदेहाचे बॅगा खाल्ले, मीडियामध्ये बोलण्यापेक्षा सभागृहात बोलावं, त्याची उत्तर आम्ही देऊ. सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ. या काळात चांगला अर्थसंकल्प मांडला जाईल. विकासाला बळ देणारे हे अधिवेशन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातोय. सरकार प्रत्येक प्रश्नावर बोलायला तयार आहे. सकारात्मक चर्चेसाठी आम्ही कायम तयार आहोत. त्यामुळे चुकीचा प्रचार करून व मीडियासमोर जाऊन बोलण्यापेक्षा सभागृहात चर्चा झाली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
विरोधकांकडून जाणीवपूर्वक वेगळं नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक या माध्यमातून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही आणि महाराष्ट्राला परवडणारं देखील नाही. मनुस्मृतीचं महाराष्ट्र सरकारने समर्थन केलेलं नाही. याउलट आमच्या सर्वांचा त्याला विरोध आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मनुस्मृती सारख्या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान असणार नाही. इतरही वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत त्याबाबत सभागृहात चर्चा होईल. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून कुठलंही अधिवेशन गुंडाळण्यात आलेलं नाही. सभागृह व्यवस्थित सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतं. प्रत्येक बिलावर, लक्षवेधीवर आणि आयुधावर चर्चा होते आणि प्रत्येक प्रश्नावर समाधानकारक उत्तर दिलं जातं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारकडे आहे. त्यांनी काय बोलायचं हा त्यांना लोकशाहीत अधिकार आहे. पण प्रत्येकाच्या प्रश्नाला राज्य सरकारकडे उत्तर आहे. याबाबत तीळमात्र शंका नाही, असं अजित पवार म्हणाले.
सीएम शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांची चर्चा करण्याची इच्छा नाही. दिलेल्या पत्रात कोणतेही मुद्दे नाहीत. तेच तेच ते मुद्दे त्या पत्रात माडंले जात आहेत. खोटे बोल रेटून बोलण्याची यांची मानसिकता आहे. स्वतंःची पाठ थोपटून घ्यायची ही त्यांची प्रवृत्ती आहे. या निवडणुकीत कोणाचे अपयश आहे. गावागावात जाऊन खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही लोकसभेत यश मिळाले आहे. त्यामुळे छाती फुगून यावेळी विरोधक मीडियासमोर आले असतील. मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. उबाठामध्ये विरोधात लढलो तर फसवून तुम्ही लोकांकडून दिशाभूल केली आहे. आमची या अधिवेशनात सर्व तयारी आहे. सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून सरकार पडते असता प्रचार केला. देव पाण्यात बुडून विरोधक बसले आहेत. विरोधकांनी शेतकऱ्यांना काय दिले. शेतकऱ्यांबद्दल भाष्य केले जाते. पण आम्ही त्यात निकष बदलले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन होते. त्यामुळे विरोधक चर्चा करतील, असा विश्वास होता. पण त्यांनी नेहमीप्रमाणे त्याची गाडी चालवली. खोटा प्रचार करून देखील कॉंग्रेसला काय मिळाले. मोदी जिंकले तरी देखील आमचे काही बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशी गत झाली आहे. उबाठा विरोधात आम्ही लढलो, त्यांना फक्त साडे चार टक्के मत राहिली आहेत. त्यामुळे लोक देखील हुशार झाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आम्ही सुरू केली. जलयुक्त शिवार योजना तुम्ही बंद केली ती आम्ही पुन्हा सुरू करणार आहे. महिलांसह, युवकांसह व सर्वांसाठी योजना चालू आहेत. शासन आपल्या दारी मधून चार कोटी लोकांना फायदा झाला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभेत संविधानाचा मुद्दा करून निवडणूकात नरेटिव्ह पसरवला. आता स्वाभीमानाचा मुद्दा काढून बोलणार आहेत. पण कसला स्वाभीमान आहे. यांना स्वाभीमान असता तर 2019 साली यांनी सत्ताबदल केली नसती. म्हणून यांचा स्वाभिमानच राहिला नाही. निरोपाचे अधिवेशन म्हणाऱ्यांनी निरोपाला तर यायला पाहिजे. काय फक्त फेसबुकवरूनच बोलणार आहेत की काय, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App